
नागपूर : कलमना मार्केटमध्ये महिलेवरील गैरवर्तनाला विरोध केल्यामुळे फळविक्रेत्याचा जीव घेणाऱ्या आरोपीला न्यायालयाने कठोर शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांच्या न्यायालयाने कान्हा मार्कंडेय याला खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवत सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
घटनेनुसार, १३ जुलै २०२३ रोजी कलमना मार्केट परिसरात आरोपी एका महिलेशी अयोग्य वर्तन करत होता. हा प्रकार पाहून फळविक्रेता अजित पठाण यांनी त्याला विरोध केला. यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने धारदार कटरने अजित पठाण यांच्यावर हल्ला चढवला. पोटावर गंभीर वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेनंतर कलमना परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली आणि तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी, वैद्यकीय अहवाल आणि अन्य ठोस पुरावे न्यायालयासमोर मांडण्यात आले. या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
न्यायालयाने आरोपीला सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यासोबतच ५०० रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास तीन महिन्यांच्या अतिरिक्त कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.
महिलेच्या सन्मानासाठी आवाज उठवणाऱ्या एका फळविक्रेत्याचा जीव गेला असला, तरी न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशा गुन्ह्यांविरोधात कडक संदेश गेला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY
निर्मल उज्ज्वल के प्रमोटर के घर पहुंचे जमाकर्ता | "हमारा पैसा वापस...
NagpurCrime : नागपुर में काली बाइक गैंग का आतंक; एक दिन में...
Amravati: दर्यापुर के ज्वेलर्स में हथियारबंद डकैती #Amravati #jewellery #Robbery #Crime #Robbery
Nagpur: Cotton Market की सद्गुरु सेल्स में भीषण आग #Nagpur #NagpurNews #FireAccident...
Nagpur: हिस्ट्रीशीटर पुलिस कस्टडी से फरार #Nagpur #NagpurNews #HistorySheeter #PoliceCustody #Crime




