नागपूर : शहरातील अवैध हुक्का व्यवसायाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डाउन टाउन कॅफेवर मोठी कारवाई केली आहे. सार्वजनिक शांतता, कायदा-सुव्यवस्था आणि जनहित लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी कॅफेचा व्यवसाय 30 दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, माउंट रोड परिसरातील डाउन टाउन कॅफेमध्ये ग्राहकांना बेकायदेशीरपणे हुक्का पुरविला जात असल्याच्या तक्रारी पोलिसांना वारंवार प्राप्त होत होत्या. यापूर्वी पोलिसांनी अनेकदा छापेमारी करून कॅफे चालकांना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच अवैध प्रकार तात्काळ बंद करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही हुक्का सेवा सुरूच असल्याचे आढळून आले.
पोलीस नोंदीनुसार, जानेवारी ते मे 2026 या कालावधीत डाउन टाउन कॅफेवर चार वेळा छापे टाकण्यात आले. प्रत्येक वेळी ग्राहक हुक्का सेवन करताना आढळले. या प्रकरणी कॅफे चालकाविरोधात कोटपा (COTPA) कायद्यान्वये गुन्हेही दाखल करण्यात आले होते. तरीही नियमांचे उल्लंघन सुरूच राहिल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घेतली.
सततच्या उल्लंघनाची गंभीर दखल घेत पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 163(2) अंतर्गत आदेश काढत कॅफेचा व्यवसाय 30 दिवसांसाठी बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
युवकांना व्यसनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न-
शहरातील अवैध हुक्का पार्लर आणि तत्सम आस्थापनांवर पोलिसांची विशेष नजर असून, युवकांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता रोखण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
नियमभंग करणाऱ्यांना दिला कडक इशारा-
डाउन टाउन कॅफेवरील कारवाईमुळे सार्वजनिक आरोग्य आणि कायदा-सुव्यवस्थेशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांविरोधात प्रशासन कोणतीही नरमाई दाखवणार नसल्याचा स्पष्ट संदेश गेला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी पुन्हा अधोरेखित केले आहे.
nagpur student protest delhi lathi charge
प्लेट हटाने को कहा तो भड़के पड़ोसी! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #news #Attack...
चाकू की नोक पर लूटपाट! #NagpurNews #CrimeNews #LatestNews #NewsUpdate #Police #KnifeAttack #Robbery
लकड़गंज में दिनदहाड़े चोरी की कोशिश नाकाम #NagpurNews #Crime #Theft #Chor #HindiNews...
कन्हान में नशे की ‘काली दुकान’ पर पुलिस का छापा! #NagpurNews #Drug...
नागपुर में अन्ना गैंग का आतंक! NagpurNews #AnnaGang #Theft #Crime #CCTV #LatestNews...





