नागपूर : शहरातील ड्रग्ज तस्कर आणि अंमली पदार्थांच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्या टोळ्यांविरोधात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे. ड्रग्जच्या पैशातून उभारण्यात आलेल्या मालमत्तांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू असून अशा मालमत्तांची यादी तयार करण्यात येत आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मालमत्तांवर बुलडोझर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी दिली.
नागपूर पोलिसांनी आता केवळ ड्रग्ज तस्करांना अटक करण्यापुरते मर्यादित न राहता त्यांच्या आर्थिक स्रोतांवरही घाव घालण्याचा निर्णय घेतला आहे. अंमली पदार्थांच्या विक्री आणि तस्करीतून कोट्यवधी रुपयांची संपत्ती उभी करणाऱ्या आरोपींची माहिती संकलित केली जात आहे.
पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांच्या माहितीनुसार, ड्रग्जच्या अवैध कमाईतून उभारलेल्या मालमत्तांची सविस्तर यादी तयार करून ती नागपूर महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अशा मालमत्तांवर बुलडोझर कारवाई केली जाईल.
गुन्हेगारांना केवळ तुरुंगात पाठविणे पुरेसे नसून त्यांच्या अवैध कमाईवरही प्रहार करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत आहे. या कारवाईमुळे शहरातील ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागपूर पोलिसांच्या या पुढाकाराकडे अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधातील निर्णायक पाऊल म्हणून पाहिले जात आहे. आता मालमत्तांची यादी तयार झाल्यानंतर पुढील कारवाई कधी आणि कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





