Published On : Tue, May 12th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात गोवंश तस्करीचा मोठा पर्दाफाश; सात जनावरे जप्त, दोन आरोपींना अटक

Advertisement

नागपूर : गणेश पेठ पोलीस ठाणे हद्दीत गीतांजली चौकाजवळ मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. भरधाव वेगात असलेली एक सवारी झायलो गाडी नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरवर आदळून उलटली. त्यानंतर समोर आलेल्या दृश्याने सर्वांनाच धक्का बसला—गाडीत अत्यंत अमानुष पद्धतीने कोंबून ठेवलेले सात गोवंश आढळून आले.

स्थानिक नागरिकांनी गाडीबाबत संशय व्यक्त करत तिचा पाठलाग सुरू केला होता. त्याचदरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर मोठी गर्दी जमा झाली आणि नागरिकांनी गाडीत असलेल्या दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्राथमिक माहितीनुसार, हे सातही गोवंश गोंदिया येथून नागपूरकडे आणले जात होते. त्यांना मोमिनपुरा परिसरातील कत्तलखान्याकडे नेले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. वाहतुकीदरम्यान कारवाईपासून बचाव करण्यासाठी गाडीवर बनावट स्वरूपात ‘प्रेस’ असा उल्लेख केल्याचेही समोर आले आहे.

पकडण्यात आलेल्या आरोपींची ओळख हयान हामिद सईद (वय २१, गोंदिया) आणि विजय पेडार सोनवानी (बालाघाट) अशी झाली आहे. तर या प्रकरणातील आणखी एक मुख्य आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Advertisement

गणेश पेठ पोलिसांनी सातही गोवंशांना तातडीने सुरक्षितपणे ताब्यात घेऊन गोशाळेत हलवले आहे. या संपूर्ण तस्करीच्या मागे कोणते मोठे रॅकेट कार्यरत आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.

या प्रकरणावर बोलताना गणेश पेठ पोलिस ठाण्याचे पांडुरंग जाधव यांनी सांगितले की, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून लवकरच संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश केला जाईल.

Advertisement
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है वसूली?

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews #KisanAndolan

मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges