Published On : Tue, Jun 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या गिट्टीखदान हत्याकांडात मोठी कारवाई; ७ आरोपी जाळ्यात, ४ अल्पवयीनांचा समावेश

Advertisement

नागपूर : गिट्टीखदान परिसरातील असद उर्फ अमन खान हत्या प्रकरणात नागपूर पोलिस आणि क्राईम ब्रँचने वेगाने कारवाई करत ७ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यामध्ये ४ अल्पवयीनांचा समावेश आहे. या कारवाईमुळे हत्या प्रकरणाचा तपास वेगाने पुढे सरकला असून शहरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जितेंद्र उर्फ जंगली पांडे, योगेंद्र उर्फ लाला शिवाकांत पांडे आणि दीपक उर्फ प्रिन्स गुप्ता यांचा समावेश आहे. उर्वरित चार आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तिन्ही प्रमुख आरोपींना पुढील कारवाईसाठी गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Gold Rate
Sept 29,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 47,300 /-
Gold 22 KT ₹ 1,36,5700 /-
Silver/Kg ₹ 2,22,300/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सोमवारी सायंकाळी फुटाळा तलाव परिसरात भुट्टा खाण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात कुख्यात शेखूचा पुतण्या असद उर्फ अमन खान याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार मयूर जाधव गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि क्राईम ब्रँचचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्यानंतर संयुक्त कारवाई करत पोलिसांनी अवघ्या काही तासांत ७ आरोपींना ताब्यात घेतले.

Advertisement

या हत्येमागे केवळ क्षुल्लक वाद होता की जुन्या वैमनस्यातून किंवा गँगवॉरच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला, याचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.