Published On : Tue, Jun 16th, 2026
By Nagpur Today Nagpur News

यशोधरानगर पोलिसांची मोठी कारवाई; 8 चोरीचे गुन्हे उघड, चौघांना अटक

Advertisement

नागपूर : शहरात वाढत्या घरफोडी आणि वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी यशोधरानगर पोलिसांनी मोठी कारवाई करत एकाच वेळी 8 चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावला आहे. या प्रकरणात चार सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपींनी यशोधरानगर, अंबाझरी, रणप्रतापनगर, लकडगंज, पाचपावली तसेच नागपूर ग्रामीणमधील रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि वाहनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख मोहिउद्दीन उर्फ रहीम शेख कलीम, मोहम्मद कैफ असमुद्दीन अन्सारी, नरेंद्र उर्फ बाली चिंतामण चौके आणि निलेश मुरलीधर बाचे अशी आहेत.

आरोपींकडून चार दुचाकी, दोन स्कूटर, सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी इतर काही गुन्ह्यांचीही माहिती दिल्याने पोलिसांनी विविध पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या प्रकरणांची पडताळणी करून चोरीचा माल हस्तगत केला.

Advertisement

यशोधरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शहर व ग्रामीण भागात सक्रिय असलेल्या चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश झाला असून आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges