Published On : Wed, Jul 1st, 2020

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना जयंतीनिमित्त विधान भवन येथे अभिवादन

नागपूर : हरित क्रांतिचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विधान भवन येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

येथील विधान भवन परिसरात सहायक अभियंता संजय सतदेवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रा. मोहन चव्हाण, तुकाराम चव्हाण, शिक्षणाधिकारी श्रीराम चव्हाण यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.