नागपूर: बुधवार, २ जुलै रोजी शहरातील काही भागांमध्ये देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे वीजपुरवठा बंद राहणार आहे. महावितरणने नागरिकांना सहकार्य करण्याचे आणि गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
या कामांमुळे महाल भागात सकाळी ८:३० ते दुपारी १२ या वेळेत रेशीमबाग आणि सिरसपेठ परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे बंद राहील. येथे रिंग मेन युनिट दुरुस्ती, नियमित देखभालीची कामे आणि सक्करदरा चौकातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे केली जाणारी उपरी वाहिनी काढण्याचे काम केले जाईल. तर सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेतगणेशपेठ, गांधी सागर तलाव परिसर, टिळक पुतळा परिसर आणि गाडीखाना परिसरातील वीजपुरवठा बंद राहील. येथे उच्च दाब वहिनीच्या भूमिगत केबल जोडणीचे व रोहित्र लावण्याचे काम केले जाईल.
याशिवाय, काँग्रेस नगर विभागात सकाळी ८ ते सकाळी ११ या वेळेत ताजेश्वर नगर, चाणक्यपुरम, मानव मंदिर, आम्रपालीनगर, सौभाग्यनगर १ व २ या भागातील वीजपुरवठा बंद राहील. सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत बहादुरा गाव, बाबा ताज नगर, शारदा नगर, शारदा लेआउट, मिलन नगर, अंबिका नगर, राम नगर, मोहित नगर आणि संत गजानन नगर या भागातील वीजपुरवठा बंद राहील सकाळी ७:३० ते सकाळी ११ या वेळेत अत्रे लेआउट, गणेश मंदिर, तात्या टोपे नगर, गोपाल भोवरे लेआउट या भागातील वीजपुरवठा बंद राहील. सकाळी ८:३० ते सकाळी ११:३० या वेळेत प्रियदर्शनी नगर, त्रिमूर्ती नगर, भामटी, गुडघे लेआउट, इंगळे लेआउट, राऊत वाडी, जयबद्रीनाथ सोसायटी, शिवशक्ती, सीजीएचएस कॉलनी, मनीष लेआउट, स्वागत सोसायटी, विजय कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, प्रज्ञा सोसायटी, वहाणे लेआउट, सोमलवाडा चौक, अपना भंडार, सावित्री विहार, श्रीराम नगर अट्टाचक्की, फडणवीस हॉस्पिटल, सोमलवाडा परिसर, जयप्रकाश नगर लेआउट क्रमांक १ ते ५, सीता नगर, राजीव नगर, तपोवन, राहुल नगर, आमराई, गणेश कॉलनी, रेल्वे कॉलनी, रामकृष्णनगर आणि शामनगर या भागातील वीजपुरवठा बंद राहील. सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत टिळक नगर आणि धरमपेठच्या काही भागातील वीजपुरवठा बंद राहील. तर, सकाळी ८:३० ते सकाळी १०:३० या वेळेत बजाजनगर येथील वीजपुरवठा बंद राहील.
गांधीबाग विभागात सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत बांगलादेश, नाईक तलाव, तांडापेठ, बंगालीपंजा, पाचपावली आणि ठक्करग्राम येथील वीजपुरवठा बंद राहील. तर, सकाळी 8 ते 11 या वेळेत तेलीपुरा, विनोबा भावे नगर, गंगा बाग, जैन मंदिर रोड या भागातील वीजपुरवठा बंद राहील.
नागरिकांनी या वेळेत विजेअभावी होणारी गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक तयारी करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.