कामठी -ग्रामीण भागातील गरीब व गरजू वंचित दिव्यांग , विधवा, परितक्त्या महिलांचा आर्थिक व सामाजिक स्तर उंचावण्यासाठी व त्यांना उद्योगी बनविण्यासाठी ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे अतिशय उत्तम उपक्रम असल्याचे मौलिक प्रतिपादन कढोली ग्रा प सरपंच प्रांजल वाघ यांनी कढोली गावात आयोजित तीन दिवसीय स्वयंसहाय्यता समूह हिशोबनिस प्रशिक्षण च्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.
महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचयत समिती कामठी च्या वतीने तालुक्यातील आदर्श गाव असलेले कढोली गावात ,स्वयंसहाय्यता समूह हिशोबनिसांचे 3 दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते .
या तीन दिवसीय प्रशिक्षणाला मोठ्या संख्येत महिलांनी सहभाग दर्शवित प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे तीन दिवसीय प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले असून या प्रशिक्षण ला तालुका समनव्यक अनुजा पाठक, ,दिनेश्वरी कोंडर ,अनिकेत तायडे प्रभाग समन्वयक,सारिका सहारे बँक सखी,दुर्गा शहाणे बँक सखि आणि सरपंच प्रांजल वाघ यांनी मोलाची भूमिका साकारली.