Published On : Thu, Mar 12th, 2020

कामठीत अवैधरित्या दारूची वाहतूक करताना एक्टिवासह तरुणास अटक,

74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, नवीन कामठी पोलिसांची कारवाई

कामठी, ता प्र 12-होळीच्या पाडव्याला धुळवडीच्या परवावर शहरात सर्वत्र दारूबंदी असताना बिनापरवाना अवैधरित्या दारूची वाहतूक करताना नवीन कामठी पोलिसांनी ऍक्टिवा सह तरुणास अटक करून 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज भैयालाल केराम वय 32 चित्तरंजन नगर अब्दुल्ला शाह बाबा दर्गा कामठी हा एक्टिवा होंडा गाडी क्रमांक एम एच 40TC 530 वर बिनापरवाना अवैधरित्या देशी दारू च्या बॉटल पिशवीत भरून घेऊन जात असताना जयस्तंभ चौक परिसरात सकाळी 11 वाजता सुमारास नवीन कामठी पोलिसांनी थांबवून चौकशी केली असता बनवाबनवि ची उत्तरे देऊ लागला पोलिसांनी पिशवी तपासली असता पिशवीमध्ये देशी भिंगरी दारू च्या 96 बॉटल आढळून आल्या त्याची किंमत 4992 व गाडीची किंमत 70 हजार एकूण 74992 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला नवीन कामठी पोलीस स्टेशनला आरोपी सुरज केराम विरोधात 65 (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली

वरील कारवाई पोलीस उपायुक्त नीलोत्पल नवीन कामठीचे वरिष्ठ ठाणेदार संतोष बकाल यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक विनोद धोगरे ,दयांचंद दुबे ,प्रमोद वाघ ,वेदप्रकाश यादव, मंगेश गिरी ,ललित शेंडे यांनी केली

संदीप कांबळे कामठी