Published On : Fri, May 21st, 2021

माहेश्वरी पंचायतच्या वतीने मनपाला पाच ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर सुपूर्द

Advertisement

नागपूर : श्री बडी मारवाड माहेश्वरी पंचायत हिवरीनगरच्या वतीने राकेश तोतला आणि विजय सारडा यांच्या सौजन्याने नागपूर महानगरपालिकेला पाच ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर सुपूर्द करण्यात आले.

मनपाच्या वतीने महापौर दयाशंकर तिवारी यांनी ते स्वीकारले. महापौर कक्षात श्री बडी मारवाड माहेश्वरी पंचायत हिवरीनगरचे पदाधिकारी पुरुषोत्तम मालू, रामअवतार तोतला, दिनेश सारडा, नंदलाल वासवान यांनी ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर महापौरांना दिले. आरोग्य विभागाच्या वतीने अतिरिक्त सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यावेळी उपस्थित होते.

माहेश्वरी पंचायतने सामाजिक बांधिकलकी म्हणून नागपूर महानगरपालिकतेर्फे सुरू असलेल्या आरोग्य यंत्रणा बळकटीकरणाच्या कार्यक्रमात ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर देऊन सहभाग नोंदविल्याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. अडचणीच्या काळात समाजातील अनेक नागरिक मदतीसाठी धावून येतात. माहेश्वरी पंचायतने सुद्धा मदतीचा हात पुढे घेऊन नवा आदर्श निर्माण केला, असेही ते म्हणाले.

माहेश्वरी पंचायतीने यापूर्वी नागपूर ग्रामीणमधील सार्वजनिक आरोग्य केंद्रांना १५, वायुसेनेला तीन, माहेश्वरी समाजाच्या ऑक्सिजन बँकेला १५ तर अन्य सात ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर विविध ऑक्सिजन बँकांना दिले आहेत.