Published On : Tue, Oct 29th, 2019

ट्रॅव्हल्सच्या धडकेत महेंद्र बोरकर यांचा मृत्य रामटेक

मनसर जवळील बंद झालेल्या ओरियनटल टोल नाक्याजवळ एका अज्ञात ट्रॅव्हलस ने मोटारसायकल वर असलेल्या इसमास टक्कर मारल्याने त्यांचा दवाखान्यात नेताना मृत्यू झाला.

राष्ट्रीय आदर्श विद्यालय रामटेक येथे कार्यरत असलेले महेंद्र बोरकर(55)मु परसोडा हे नागपूर वरुन रामटेककडे मोटारसायकल ने येत असताना सायंकाळी 6.30ला मोटारसायकल क्रमांक MH 40 AA 4488 ला मनसर जवळील टोलनाक्यावरील राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने जोरदार टक्कर दिल्याने ते जखमी झाले आणि त्याच अवस्थेत त्यांना अंबुलन्समध्ये कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. संध्याकाळचा अंधार असल्यामुळे ट्रॅव्हल्स कोणत्या क्रमांकाची व कुठल्या कंपनीची होती हे मात्र कळले नाही .

Advertisement

Advertisement

रामटेक पोलिसांना माहीत होताबरोबर ते घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला.शांत, मृदू भाषा, संयमी व्यक्तीमत्वाचे धनी असलेले बोरकर सर यांच्या आठवणी नी मन गहिवरले । अचानक घडलेल्या ह्या दुदैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement