Published On : Tue, Oct 29th, 2019

दीपावलीच्या पहाटे राममंदिरावर भक्तांची अलोट गर्दी

Advertisement

रामनामाने व भक्तांच्या गर्दीने दुमदुमला गडमंदिर परिसर रामटेक(शहर प्रतिनिधी)

निसर्गरम्य वातावरण, धार्मिक, आध्यात्मिक, पौराणिक वारसा तसेच श्रीप्रभु रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या रामटेक नगरीची दिवाळी आगळीवेगळी आणि वैविध्यपूर्ण असते .त्यातही काकड आरती ,राममंदिर आणि भक्तांच्या नात्याच्या भावपूर्ण अनुभवाचं दर्शन होते ते पहाटेला काकड आरतीच्या वेळी.लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तर अलोट गर्दीने राममंदिर गर्दीने फुलून निघत .रामटेक कर नागरिक आनी परिसरातील गावखेड्यातील भक्तगण श्रीप्रभुरामचंद्राचे दर्शन व काकड आरतीने आपल्या दिवाळीसणाची मंगलमय सुरुवात करतात.

Advertisement
Advertisement

कोजागिरी च्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होणारी काकड आरती रामटेक नगरीच वैभव आहे.अखंडपणे दरवर्षी सुरू असलेली काकड आरती आजही तितक्याच उत्साहात हजारो भाविकांच्या उपस्थितीत सम्पन्न होत असते भाविकांचा सततचा ओघ वातावरण भक्तिमय करून टाकत .

याही वर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी साडेतीन पासून सुरू झालेली,पहाटे पाचला मुकुंदा पंडे व सर्व पुजारी मंडळी तसेच भक्तगणाच्या श्रद्धायुक्त अंतकरणातून काकड आरती सम्पन्न झाली.यावेळी भक्तगण राजकीय ,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी , रामटेक व परिसरातील खेडेगावातील भक्तगणही मोठया संख्येने उपस्थित होते व त्यांनी भक्तिमय अंतकरणातून राममंदिरात प्रभू श्रीराम चंद्र व परिसरातील देवळात जाऊन देवदर्शन घेतले.लहान मुले -मुली,तरुण-तरुणी ,अधिकारी वर्ग यांनीही देवदर्शन घेतले.

दिवाळी पहाट चे औचित्य साधून मोनु रघुवंशी अखिलेश अबागड़े ,अमन जैन ,पीयूष जामभूलकर, निखिल उईके ,अनमोल जैन, शुभांगी सहारे ,चेतन ढोरे, आदिंनी दिवाळी निमित्त रामराज्य ढोल ताशा व ध्वज पथक माहावादन चे उत्कृष्ठ सादरीकरण प्रस्तुत केले।

ह्यावेळी नवनिर्वाचित आमदार ऍड. आशिष जयस्वाल, प्रकाश कस्तूरे , शेखर बघेले ,श्रीकांत येरपुडे आदी राम भक्त यांची उपस्थिती होती।

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement