Published On : Tue, Dec 10th, 2019

जगनाथ बुधवारी, मस्कासाथ, इतवारीतील वीज पुरवठा बुधवारी बंद राहणार

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीसाठी बुधवार दिनांक ११ डिसेंबर रोजी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान “रामगिरी” तसेच जागनाथ बुधवारी, मस्कासाथ, इतवारीतील वीज पुरवठा बंद राहणार आहे.

सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवास्थान “रामगिरी” तसेच सेमिनरी हिल्स परिसरात उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या निवास्थानातील वीज पुरवठा बंद राहणार आहे.सकाळी ८. ३० ते दुपारी १२ या वेळेत राजीव गांधी नगर, विनोबा भावे नगर, संजय गांधी नगर,सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत जागनाथ बुधवारी, मस्कासाथ, इतवारी, भारत माता चौक, टी. बी. वॉर्ड, बोहरा मशीद, शांती नगर परिसर, अन्सार नगर, भानखेडा, पाचपावली, सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत वर्धमान नगर, स्मॉल फॅक्टरी एरिया येथील वीज पुरवठा बंद राहील.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत फ्रेंड्स कॉलनी, आकार नगर, गौरखेडे कॉम्प्लेक्स, सुरेंद्रगढ, जागृती कॉलनी, स्वागत पार्क, कोलबास्वामींनी , सकाळी ७ ते १० या वेळेत विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व परिसर, तहसील कार्यालय, उद्योग भवन येथील वीज पुरवठा बंद राहील.

सकाळी ८ ते १० या वेळेत गुलाब बाबा आश्रम, दसरा रोड, राणी भोसले विहार, भुतिया दरवाजा, नाईक रोड,कोठी रोड, उपाध्ये रोड , सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत संत्रा मार्केट, बाजेरिया, भोईपुरा, सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत भालदारपुरा,गंजीपेठ, गीतांजली टॉकीज, सिद्धेश्वर नगर,हुडकेश्वर नगर, शाम नगर, मेहेरबाबा नगर, जानकी नगर,अवधूत नगर, महाकाळकर नगर,श्रीनगर,जुना सुभेदार ले आऊट, सुर्वे ले आऊट, चक्रधर नगर येथील वीज पुरवठा बंद राहील.

सकाळी ८ ते १२ या वेळेत मरारटोली,अमरावती रोड, अभ्यंकर नगर, बजाज नगर,माधव नगर,श्रध्दानंदपेठ, शंकर नगर, कार्पोरेशन कॉलनी, धरमपेठ, भगवाघर ले आऊट, दीनदयाळ नगर, पडोळे हॉस्पिटल परिसर, विद्या विहार,गोपाळ नगर, नवनिर्माण सोसायटी, उज्वल नगर,कन्नमवार नगर, येरला,बोधला, पिपला,हुडकेश्वर, फेटरी गाव, चिंचोली, बोरगाव,गोरेवाडा, दवलामेटी, बहादुरा, गणेशनगर, ताज नगर,मिलन नगर,बेलतरोडी, पद्मावती नगर, रेवती नगर, शिवशक्ती नगर, वेणा नगर, आंबेडकर नगर, येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ८ ते ११ या वेळात अत्रे ले आऊट,तात्या टोपे हॉल, सुरेंद्र नगर, गोर्ले ले आऊट, नेलको सोसायटी, त्रिमूर्ती नगर, प्रसाद नगर, दुबे ले आऊट, शारदा ले आऊट, प्रगती नगर, संघर्ष नगर, दंतेश्वरी, सावरकर नगर,देव नगर,नेहरू नगर, संताजी कॉलेज येथील वीज पुरवठा बंद राहील. सकाळी ९ ते ११ या वेळेत रामकृष्ण नगर, अजनी चौक, वसंत नगर,लक्ष्मी नगर,बालजगत परिसर, नीरी कॉलनी, केंद्रीय कारागृह, शनी मंदिर, हरिदेव हॉटेल, तेलीपुरा, कोष्टींपुरा, रामदासपेठ परिसर येथील वीज पुरवठा बंद राहील.

Advertisement
Advertisement