Advertisement
उपमहापौर आणि शिक्षण समितीचा आकस्मिक दौरा : कारणे दाखवा नोटीस
नागपूर: नागपूर महानगरपालिका संचालित एकात्मतानगर मराठी उच्च प्राथमिक शाळा आणि जयताळा माध्यमिक शाळेला सोमवारी (ता. ९) उपमहापौर मनीषा कोठे, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे व समिती सदस्यांनी आकस्मिक भेट दिली.
या भेटीत एका शाळेत अनियमितता आढळून आली तर दुसऱ्या शाळेत सारेच ऑलवेल होते. अनियमितता आढळून आलेल्या शाळेतील काही शिक्षकांना कारणे दाखवा नोटी देण्यात आली असून दोषी आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश उपमहापौर मनीषा कोठे यांनी दिले.