Published On : Fri, May 26th, 2017

पावसाळ्यासाठी महावितरण सज्ज

Advertisement

Mahavitaran Logo Marathi
नागपूर:
काही दिवसांवर आलेल्या पावसाळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महावितरणने नागपूर व वर्धा शहरासह ग्रामीण भागात सुरु केलेली वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे आहेत.

नागपूर परिमंडलात आवश्यक असलेल्या ठिकाणी व संबंधीत परिसरातील वीजग्राहकांना वीजबंदची पूवर्सूचना देऊन देखभाल व दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर करण्यात आली. पावसाळ्यात वीजयंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तसेच वीजपुरवठा खंडित होण्याचे धोके टाळण्यासाठी महावितरणकडून उपाययोजना सुरु केल्या आहेत. यात प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणार्‍या झाडांच्या फांद्या तोडून टाकणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, ऑईल फिल्टरेशन, उपकेंद्रातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जींग, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीज खांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे, तसेच पावसाचे पाणी साचणार्‍या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे आदी कामांचा समावेश आहे. तसेच, रोहित्र आणि वीजयंत्रणेच्या ठिकाणी नागरिकांनी टाकलेला कचराही या मोहिमेत साफ करण्यात येत आहे.

खासगी किंवा संस्थांच्या मालकीच्या जागेतील झाडे किंवा मोठ्या लांबीच्या फांद्या वादळी व मुसळधार पावसामुळे वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. या शक्यतेचा अंदाज घेऊन संभाव्य धोका निर्माण करणार्‍या झाडांची किंवा मोठ्या फांद्यांची संबंधितांनी महानगरपालिकेची परवानगी घेऊन कटाई करावी. त्यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन महावितरणने केले आहे. पावसाळ्यात वीजतारांवर, खांबांवर झाडे पडून, पूरपरिस्थिती किंवा अतवृष्टीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी किंवा आवश्यक उपाययोजना करण्यासाठी सर्व विभागांतर्गत साधनसामुग्रीसह फिरते पथक तयार ठेवण्यात येणार आहे.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

वीजग्राहकांसाठी टोलफ्री क्रमांक
शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केद्रांचे १८00-२00-३४३५ किंवा १८00-न३३-३४ऩ५ हे दोन टोल फ्री क्रमांक चोवीस तास उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीजग्राहकांना वीजसेवेविषयक तक्रार दाखल करता येणार आहे.

Advertisement
Advertisement