Published On : Fri, May 26th, 2017

परिवहन समिती सभापतीपदी जितेंद्र (बंटी) कुकडे अविरोध

Advertisement


नागपूर:
परिवहन समितीच्या सभापतींची निवड प्रक्रिया शुक्रवार २६ मे रोजी पार पडली. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी जितेंद्र (बंटी) कुकडे यांची निवड झाल्याचे घोषित केले.

सकाळी ११ वाजताच्या पूर्वी बंटी कुकडे यांनी निगम सचिव हरिश दुबे यांच्याकडे नामनिर्देशन अर्ज सादर केला. सूचक प्रवीण भिसीकर तर अनुमोदक अर्चना पाठक होत्या. परिवहन समिती सभापती पदी बंटी कुकडे यांचा एकमेव नामनिर्देशित अर्ज निगम सचिव यांना प्राप्त झाला. नामनिर्देशित अर्ज मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटांचा अवधी संपल्यानंतर पीठासीन अधिकारी सचिन कुर्वे यांनी बंटी कुकडे यांची परिवहन समिती सभापती पदी निवड झाल्याची घोषणा केली व तुळशीचे रोपटे देऊन त्यांचे अभिनंदन केले. यानंतर अनिश्चित काळासाठी पीठासीन अधिकारी यांनी सभा स्थगित केली.

याप्रसंगी स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, परिवहन समितीचे सदस्य प्रवीण भिसीकर, अभिरुची राजगिरे, अर्चना पाठक, उज्जवला शर्मा,, मनीषा धावडे, विद्या मडावी, वैशाली रोहणकर, कल्पना कुंभलकर, नरेंद्र वालदे आदी उपस्थित होते.

Advertisement


निवडीनंतर जितेंद्र कुकडे यांचा पदग्रहण सोहळा पार पडला. स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी आणि परिवहन समितीच्या अन्य सदस्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement