Published On : Mon, Jul 6th, 2026
By Nagpur Today Nagpur News

संत शिरोमणी प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यांच्या जयंतीनिमित्त महावितरणतर्फे विनम्र अभिवादन

Advertisement

नागपूर,: अध्यात्म, तत्त्वज्ञान आणि भक्तीसाहित्याचे महामेरू, संत शिरोमणी प्रज्ञाचक्षू श्री गुलाबराव महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज महावितरणच्या नागपूर परिमंडल कार्यालयात त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

विद्युत भवनातील आयोजित कार्यक्रमात महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी श्री गुलाबराव महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले. या प्रसंगी बोलताना, श्री गुलाबराव महाराजांचे अध्यात्मिक कार्य आणि त्यांनी निर्माण केलेली अमूल्य साहित्य संपदा आजही मार्गदर्शक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

ज्ञानेश्वर माऊलींच्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यात श्री गुलाबराव महाराजांचे योगदान अतुलनीय आहे. माधुर्यभक्तीचे महान उपासक असलेल्या महाराजांनी संस्कृत, मराठी, हिंदी, ब्रजभाषा आणि वऱ्हाडी अशा विविध भाषांत विपुल लेखन केले. त्यांच्या लेखणीतून 134 ग्रंथ, 2,099 अभंग, २2,252 पदे, 1,250 गीते, 1,000 श्लोक आणि 23,000 ओव्यांची निर्मिती झाली असून, ही साहित्यसंपदा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अनमोल ठेवा आहे.

या कार्यक्रमात स्मिता माटे यांनी श्री गुलाबराव महाराज यांच्या जीवनकार्यावर आणि त्यांच्या विचारांच्या प्रभावावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी अधीक्षक अभियंता संजय वाकडे, दिपाली माडेलवार, कार्यकारी अभियंता अमित शिवलकर, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) सुधीर टेकाम यांच्यासह महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, विभागप्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.