Advertisement
Mahavitaran Employee Strike Called Off: राज्यभरातील महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी (MSEB Employee Strike) खासगीकरणाच्या (Privatization) विरोधात कर्मचाऱ्यांनी 3 दिवसांचा संप पुकारला होता. यामुळे राज्यातील काही भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता. वीज कर्मचारी संपावर गेल्यास मेस्मा म्हणजे अत्यावश्यक सेवा कायदा लागू करण्याचा इशारा राज्य सरकारनं दिला होता. यानंतर आज वीज कर्मचारी आणि उपमुख्यमंत्री-उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यात बैठक पार पडली, या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला आहे.