Published On : Tue, Apr 9th, 2024

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; ठाकरे गट 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेसला 17 जागा जाहीर !

Advertisement

नागपूर : लोकसभा निवडणूक 2024 साठी अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला आहे. यानुसार शिवसेना ठाकरे गट 21, राष्ट्रवादी काँग्रेस 10 आणि काँग्रेस 17 जागांवर निवडणूक लढणार आहे. कित्येक दिवसांपासूनचा महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा सुटत नव्हता. अखेर यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. इतके नाही तर सांगली आणि भिवंडीच्या जागांचाही तिढा सुटला आहे. आज मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार , काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही (Nana Patole) उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा जागावाटप जाहीर केला.

काँग्रेसच्या 17 जागा –
नंदूरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड जालना, पुणे, मुंबई उत्तर मध्य, उत्तर मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, लातूर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 10 जागा –
बारामती, शिरुर,सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर, दक्षिण बीड

शिवसेना ठाकरे गटाच्या 21 जागा-
दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई,मुंबई ईशान्य, जळगाव, परभणी, नाशिक पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशीव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, बुलढाणा, हातकणांगले छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ- वाशिम