Published On : Fri, Jul 8th, 2022
By Nagpur Today Nagpur News

महाविकास आघाडीच्या काळातील प्रभागरचना रद्द कराव्या

Advertisement

माजीमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे : निवडणूक आयोगाला विनंती

नागपूर : महाविकास आघाडीच्या काळात सर्व नेत्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून मनपा, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पंचायतमध्ये नियमबाह्य वाॅर्ड व प्रभागरचना केल्या. हजारो हरकती, सूचना डावलून स्वतःचे उमेदवार कसे निवडून येतील, अशा प्रभागरचना, जिल्हा परिषदेच्या गट, गणाच्या रचना केल्या. या चुकीच्या प्रभागरचनांची समिक्षा करावी, पुन्हा प्रभागरचना कराव्या, नंतरच निवडणुका घ्याव्या, अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली असल्याची माहिती माजी उर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
प्रभागरचनेमध्ये दुरुस्तीशिवाय निवडणूक करू नये, सूचना, हरकतीचा विचार करून प्रभागरचना, गट गणाची रचना करावी, असे आमदार बावनकुळे म्हणाले. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे निवडणुका घ्याव्या, अन्यथा त्या राजकीय होतील, असेही आमदार बावनकुळे यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या दबावात या प्रभागरचना, गट गण रचना करण्यात आली. अशा पद्धतीने निवडणूक झाल्यास निवडणूक आयोगाच्या नियमांचा भंग होईल. त्यामुळे महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत व जिल्हा परिषदेतील गट, गण रचना निवडणूक आयोगाने रद्द कराव्या. जिल्हा परिषदेत गट, गण करताना चुकीच्या गावांचा समावेश करण्यात आला. या सदोष रचना रद्द करण्यात याव्या, अशी मागणी केल्याचे आमदार बावनकुळे यांनी सांगितले.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

काॅंग्रेस नेते शेख हुसेनवर कारवाई करावी
काॅंग्रेस नेते शेख हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली. पोलिसा आयुक्तांनाही निवेदन दिले. विधी सल्लागाराचा सल्ला घेऊन याप्रकरणी कुठले गुन्हे दाखल होतात, त्याबाबत माहिती आयुक्तांना दिली. पण अजूनही पोलिसांनी हुसेन यांच्यावर आवश्यक ती कायदेशीर कलम लावली नाही. यासंदर्भात पोलिस आयुक्तांना भेटणार असून पुढची भूमिका आम्हाला ठरवावी लागेल, असा इशारा देणार आहे. एकीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत चुकीची पोस्ट टाकल्याने काहींना जेलमध्ये रहावे लागले. परंतु सत्तेचा वापर करीत हुसेन यांच्यावर लहान कलम लावली व त्यांना सोडून दिले. तातडीने नियमाप्रमाणे कारवाई केली पाहिजे, असेही आमदार बावनकुळे म्हणाले.

Advertisement
Advertisement
Advertisement