Published On : Thu, Feb 25th, 2021

महापारेषण चे शटडाऊन: गोधनी पेंच-४ जलशुद्धीकरण केंद्र २७ फेब्रू रोजी राहणार बंद

८ जलकुंभांचा पाणीपुरवठा शनिवारी राहणार बाधित

नागपूर: महापारेषण (MahatransCo) यांनी काही देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी १३२ के वी मनसर सब स्टेशन येथे शनिवार , २७ फेब्रू २०२१ रोजी ३ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. आधी हे शटडाऊन २२ फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार होते पण काही अपरिहार्य कारणामुळे ते रद्द करून आता २७ फेब्रुवारी (शनिवारी) घेण्यात येणार आहे.

नागपूर महानगरपालिकेने ह्या शटडाऊन ला मान्यता दिली आहे. ह्या ३ तासाच्या शटडाऊन मुले नागपूर मनापा आणि OCW चे गोधनी नवेगाव खैरी आणि पेंच ४ जलशुद्धीकरण केंद्र हे २७ फेब्रू , शनिवारी सकाळी ८ ते ११ पर्यंत बंद राहणार आहे .

या शटडाऊन कामामुळे आशीनगर, लक्ष्मी नगर, धरमपेठ, हनुमान नगर व नेहरू नगर झोन्समधील ८ जलकुंभांचा.. नारा नारी, जरीपटका (आशी नगर झोन), धंतोली (धरमपेठ झोन), लक्ष्मी नगर (लक्ष्मी नगर झोन), नालंदा नगर, श्री नगर, ओंकार नगर जुने, नवे, म्हाळगी नगर (हनुमान नगर झोन), हुडकेश्वर व नरसाळा गाव.. पाणीपुरवठा शनिवार २७ फेब्रुवारी रोजी बाधित राहील.

या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे ८ जलकुंभ पुढीलप्रमाणे:

नारा जलकुंभ: निर्मल सोसायटी, आराधना कॉलोनी, शंभू नगर, शिवगिरी लेआऊट, नूरी कॉलोनी, तवक्कल सोसायटी, आर्य नगर, ओम नगर, नारागाव, वेलकम सोसायटी, देवी नगर, प्रीति सोसायटी

नारी/जरीपटका जलकुंभ: भीम चौक, हुडको कॉलोनी, नागार्जुना कॉलोनी, कस्तुरबा नगर, कुकरेजा नगर, मार्टिन नगर, विश्वास नगर, ख़ुशी नगर, LIG कॉलोनी, MIG कॉलोनी, सुगत नगर, कबीर नगर, कपिल नगर, कामगार नगर, रमाई नगर, दीक्षित नगर, सन्याल नगर, चैतन्य नगर, सहयोग नगर मानव नगर, शेंडे नगर, राजगृह नगर, लहानुजी नगर

लक्ष्मी नगर नवे जलकुंभ: सुरेंद्र नगर, देव नगर, सावरकर नगर, विवेकानंद नगर, विकास नगर, हिंदुस्तान कॉलोनी, प्रगती नगर, गजानन नगर, सहकार्य नगर, समर्थ नगर (पूर्व व पश्चिम), प्रशांत नगर, संपूर्ण अजनी भाग, उरुवेला कॉलोनी, राहुल नगर, नवजीवन कॉलोनी, छत्रपती नगर पावर हाऊसजवळ, कानफाडे नगर, विश्राम नगर, संताजी नगर, नरगुंदकर लेआऊट, LIC कॉलोनी, रामकृष्ण नगर व इतर

धंतोली जलकुंभ: धंतोली, कॉंग्रेस नगर, हम्पयार्ड रोड, तकिया स्लम.

ओंकार नगर १ व २ जलकुंभ: रामटेके नगर, रहाटे नगर टोली, अभय नगर, गजानन नगर, जोगी नगर, पार्वती नगर, भीम नगर, जय भीम नगर, जयवंत नगर, शताब्दी नगर, कुंजीलालपेठ, हावरापेठ, बालाजी नगर, चंद्र नगर, नालंदा नगर, रामेश्वरी, बॅनर्जी लेआऊट

म्हाळगी नगर जलकुंभ: सन्मार्ग नगर, अन्नपूर्णा नगर, नवे नेहरू नगर स्लम, विघ्नहर्ता नगर, संतोषी नगर, सरस्वती नगर, शिवशक्ती नगर, जानकी नगर, न्यू अमर नगर, विज्ञान नगर, गुरुकुंज नगर, म्हाळगी नगर, गजानन नगर, प्रेरणा नगर, सूर्योदय नगर, महालक्ष्मी नगर, महात्मा गांधी नगर, अष्टविनायक कॉलोनी, राधाकृष्ण नगर, शिवाजी नगर, मां भगवती नगर

श्री नगर जलकुंभ: श्री नगर, सुंदरबन, ८५प्लॉट, सुयोग नगर, साकेत नगर, अरविंद सोसायटी, बोरकुटे लेआऊट, PMG सोसायटी, विजयानंद सोसायटी, संताजी सोसायटी, डोबी नगर, म्हाडा कॉलोनी, ई.

नालंदा नगर जलकुंभ: जय भीम नगर, पार्वती नगर, ज्ञानेश्वर नगर, कैलाश नगर, बालाजी नगर, चंद्र नगर, नाईक नगर, मित्र नगर, गजानन नगर, रामेश्वरी, बॅनर्जी लेआऊट, नालंदा नगर, बँक कॉलोनी