Published On : Tue, May 28th, 2019

महा मेट्रो : सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटीव्ह चौक (रिच – २) मेट्रोचे ५० टक्के कार्य पूर्ण स्टेशन,व्हायाडक्टचे कार्य प्रगतीपथावर

Advertisement

नागपूर: शहरात निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पाच्या चारही मार्गिकांवर मेट्रो प्रकल्पाचे वेगाने कार्य पूर्ण होत आहे. ज्याप्रमाणे वर्धा मार्गावरिल रिच-१ मेट्रो सेवा सुरु झाली असून हिंगणा मार्गावरील (रिच-३) येथे लवकरच मेट्रो सेवा सुरु करण्याचा महा मेट्रोचा मानस आहे. असे असतांना सिताबर्डी ते आटोमोटीव्ह चौक दरम्यान असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या कामाने वेग घेतला असून ५०% जास्ती कार्य याठिकाणी पूर्ण झाले आहे. सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटीव्ह चौक पर्यंत अश्या ७.२३ किमीच्या या मार्गावर एकूण ६ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे.

या मार्गावर शासकीय कार्यालय,रिजर्व बँक,खाजगी – व शासकीय बँक,औद्योगीक वसाहती,शासकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे रिच-२ मार्गावर वाहनचालकांची मोठी गर्दी होताना निदर्शनास येते. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावर जड वाहणाचे आवागमन देखील मोठ्या प्रमानात होते. यामुळे वाहन चालवताना होणारा त्रास आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी येणाऱ्या काळात मेट्रो फायदेशीर ठरणारच सध्या याठिकाणी वाहतुकीचे सुयोग्य व्यवस्थापन करून मेट्रोचे कार्य पूर्ण केले जात आहे.

या भागात मेट्रोच्या निर्माण कार्याला नागरिकांचा देखील उत्तम सहकार्य याठिकाणी महा मेट्रोला मिळत आहे.तसेच या मार्गावर निर्माण करण्यात येत असलेला गद्दीगोदाम चौक ते आटोमोटिव्ह चौक पर्यत मेट्रो निर्माण कार्यासोबतच डबल डेकर उड्डाणपुलाचे निर्माण कार्य होत असल्याने, कार्य पूर्ण झाल्यास या मार्गावर महत्वाचा बदल नागरिकांना येत्या काळात बघायाला मिळणार आहे तसेच या मार्गावरील गुरुद्वार जवळील भारतीय रेल्वेच्या पुलावर चार मजली वाहतुकीचे स्थळ बघायला मिळणार आहेत. सर्वात खालच्या मजल्यावर रस्ता वाहतूक, पहिल्या मजल्यावर भारतीय रेल्वे, दुसऱ्या मजल्यावर (डबल डेकर) राष्ट्रीय महामार्ग व चौथ्या मजल्यावर नागपूर मेट्रोची वाहुतुक होणार आहे.

आतापर्यंत झालेल्या कार्याची अधिकृत आकडेवारी पुढील प्रमाणे आहे :
पायलिंग ९६%,पाईल कॅप ८५%,पियर ७६%,सेग्मेंट कास्टिंग ३३%,मेट्रो स्टेशन कार्य ५४% झाले असून गर्डर लाँचिंग चे कार्य प्रगतीपथावर आहे.