Published On : Fri, Apr 24th, 2020

म. बसवेश्वर जयंती घरी साजरी करा

बाराव्या शतकातील आदय समाजसुधारक व (लिंगायत) धर्मसंस्थापक म. बसवेश्वर यांचे जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी अक्षय तृतीया या दिवशी म. बसवेश्वर पुतळा, न्यु सुभेदार ले आऊट, नागपूर येथे मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो यंदा २६ एप्रील २०२० रोजी म. बसवेश्वर जयंती आहे परंतु जागतीक माहामारी करोनाच्या प्रार्दुभावामुळे व सरकार तर्फे लॉकडाऊन घोषीत झाल्यामुळे म. बसवेश्वर जयंतीचा कार्यक्रम म. बसवेश्वर पुतळ्याजवळ साजरा करण्यात येणार नाही

तेव्हा सर्व समाजबांधवांना अशी विनंती करण्यात येते की त्यांनी म. बसवेश्वर जयंती आपल्या घरी सकाळी ९ वाजता भस्म धारण करून व म. बसवेश्वराच्या फोटोला माल्यार्पण करून म.बसेवश्वराचा जयघोष करुन आपल्या कुटुंबियासह आपल्या घरीच साजरी करावी ही विनंती.