Published On : Wed, Oct 24th, 2018

नागपूर महानगरपालिकेत महर्षी वाल्मीकी जयंती साजरी

महापौर व्दारा विनम्र अभिवादन

वाल्मीकी रामायण या महाकाव्याव्दारे प्रभू रामचंद्राचे जीवनचरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून समाजामध्ये आदर्श राज्याची संकल्पना साकारणारे रामायण रचयिता महर्षी वाल्मीकी यांच्या जयंती निमित्त म.न.पा.केन्द्रीय कार्यालयातील महर्षी वाल्मीकी यांच्या तैलचित्राला महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी पुष्पहार अर्पण करुन नागपूर नगरीतर्फे विनम्र अभिवादन केले. त्याचप्रमाणे महापौर यांचे सभाकक्षातील तैलचित्राला सुध्दा यावेळी महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

या प्रसंगी कर आकारणी समितीचे सभापती श्री.संदीप जाधव, विधी समितीचे सभापती ॲड धम्मपाल मेश्राम, ज्येष्ठ नगरसेवक श्री. सूनिल अग्रवाल, ज्येष्ठ नगरसेवक श्री.किशोर जिचकार, नगरसेविका श्रीमती लिला हाथीबेड, माजी नगरसेवक श्री. रंज्जन चावरिया, अजय हाथीबेड, सहा.आयुक्त श्री.महेश धामेचा, निगम सचिव श्री. हरिष दुबे, नंदकिशोर महतो, जयसिंग कुछवाह, संजय मेंडुले, मोती जनवारे, शशी सारवन, दिवांशू लिंगायत, संजय रासेवानी, उमेश गौर, देवराव मांडवकर, सतिश ‍सिरसवान, अरुण तुर्केल, सुनिल तांबे, राकेश सकंत, नरेश खरे यांचेसह बहूसंख्य गणमान्य नागरिक उपस्थित होते.