Published On : Mon, Mar 2nd, 2020

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदी कामठी चे हुकुमचंद आमधरे विजयी

कामठी ता प्र 2:-,29 फेब्रुवारी ला झालेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पदाच्या निवडणुकीचा आज जाहीर झालेल्या निवडणूक निकालात नागपूर विभागातून महा विकास आघाडीचे कांग्रेस चे उमेदवार कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकुमचंद आमधरे व राष्ट्रवादी कांग्रेस चे उमेदवार व हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती सुधीर कोठारी विजयी झाले

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नागपूर विभागातून निवडून देण्याच्या दोन जागेसाठी संचालक पदाच्या निवडणुकीत 672 मतदारांपैकी 636 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता महा विकास आघाडीचे उमेदवार कामठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकुमचंद आमदार यांनी 387 मते घेत विजय संपादन केला तसेच सुधीर कोठारी यांना 492 मते मिळाली. तर हुकुमचंद आमधरे यांची मुंबई संचालक पदाच्या निवडणुकीत विजय झाल्याचे जाहीर होताच कृषिमंत्री सुनील केदार, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव सुरेश भोयर ,कामठी नगर परिषदेचे अध्यक्ष शहाजहा शफाहत ,उपाध्यक्ष शाहिदा कलीम अन्सारी , कामठी नगर परिषद चे माजी उपाध्यक्ष काशीनाथ प्रधान, कामठी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रमोद महल्ले,संचालक ज्ञानदेव गावंडे, मनोहर कोरडे ,सुनील अग्रवाल ,कामठी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कंभाले , जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवाळे, कामठी पंचायत समितीचे उपसभापती अशिष मल्लेवार, पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी , दिलीप वंजारी, दिशा चनकापुरे, माजी सभापती रमेश भोयर ,नाना मंडलीक, माजी जिल्हा परिषद सदस्य कुंदा आमधरे ,ग्रामपंचायतीचे माजी सरपंच देवराव आमधरे, माजी सरपंच मधुकर मुलमुलेसह अनेकांनी अभिनंदन केले.

संदीप कांबळे कामठी