Published On : Fri, Aug 2nd, 2019

महाराष्ट्रीयन जनतेने भाजप ला महाजनादेश द्यावा – देवेन्द्र फडणवीस

Advertisement

महाजनादेश रॅलीचे बुटी बोरीत जंगी स्वागत

नागपूर:- राज्यात व देशात कित्येक वर्षांपासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार हे सत्तेत होते.परंतु या सरकारने राज्यातील जणते करीता कुठल्याही कल्याणकारी योजना न राबविता फक्त राज्यातील जनतेला मूर्ख बनविण्याचे काम केले.महाराष्ट्रातील सर्व गोरगरीब व्यक्तीला विनामूल्य आरोग्यसेवा महाराष्ट्र सरकार ने उपलब्ध करून दिल्या.अन्न, वस्त्र,निवारा,शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात सरकारने विविध योजना राबविल्या.म्हणून मागील पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्र सरकारने विकासाचे कामे केले असल्यासच भाजप पक्षाला जनादेश द्यावा तसेच हा जनादेश छोटा नाही तर महाजनादेश असावा.असे बुटी बोरी येथे पोहचलेल्या महाजनादेश रॅली निमित्य बुटीबोरी येथील जनतेला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी मत व्यक्त केले.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतायरीकरिता जनतेच्या आशीर्वादाने भाजप ला महाजनादेश मिळावा म्हणून अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन असलेली धरती गुरुकुंज मोझरी येथून दि १ ऑगस्ट ला निघालेल्या महाजनादेश रॅली चे बुटी बोरी येथील भाजप कार्यकर्ते व बुटी बोरी नगरपरीषदेचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी जंगी स्वागत केले.यावेळी मंचकावर राज्याचे उत्पादन शुल्क व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,वरिष्ठ नेता दत्ता मेघे,आ गिरीश व्यास,आ सुधीर पारवे,आ डॉ पंकज भोयर,आ मल्लिकार्जुन रेड्डी,आ समीर मेघे,भाजपा जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार,सुधाकर ढोणे,अरविंद गजभिये आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सभेला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी विरोधकांचे चिमटे काढतांना जनतेने विरोधकाला का नाकारले याचे आत्मचिंतन करण्याची गरज असून त्यांनी ईव्हीएम मशीनच्या विरोधात मोर्चा काढण्यापेक्षा जनतेच्या मूलभूत सुविधे करिता मोर्चे काढून आंदोलन केले असते तर त्यांना अधिक फायदा झाला असता असा खोचक सल्ला ही देण्याचे विसरले नाही.

या महाजनादेश रॅली करिता बुटी बोरी व आसपासच्या परिसरातून हजारो भाजप कार्यकर्ते उपस्थित झाले होते.संपूर्ण सभामंडप कार्यकर्त्यांनी खचाखच भरलेला होता.कार्यक्रमाचे संचालन बुटी बोरी नगरपरिषदेचे मनोणीत नगरसेवक प्रवीण शर्मा यांनी तर आभार नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी व्यक्त केले.

या महाजनादेश रॅली च्या यशस्वीतेकरिता बुटी बोरी भाजप मंडळ अध्यक्ष आकाशदादा वानखेडे,भाजप शहर अध्यक्ष मंगेश आंबटकर,बुटी बोरी नागरपरिषदेशे उपाध्यक्ष अविनाश गुर्जर,सत्तापक्ष नेता अरविंद जैस्वाल,मनोणीत नगरसेवक प्रवीण शर्मा,हिंगना विधानसभा क्षेत्राचे दिग्गज नेते हरिश्चंद्र अवचट,नगरसेवक मंदार वानखेडे,विनोद लोहकरे,सनी चौव्हान,सुनीता जेऊरकर,संध्या आंबटकर,दीपक गुर्जर,प्रशांत डाहुले,नरू गौतम,विरु गौतम,रुपेश इचकाटे,शफी भाई शेख,दिलावर खान आदीने परिश्रम घेतले.

जोरदार पाऊसात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता
महाजनादेश रॅली बुटी बोरीत पोहचण्यापूर्वीच जोरात पावसाला सुरुवात झाली.परंतु या जोरदार पावसातही सभेकरिता करकर्ते भिजत भिजत येत होते.१:१० मिनिटांनी रॅली ही सभामंडपात पोहचली.आणि पावसाने जोर पकडला तरीही कार्यकर्त्यांचे येणे सुरूच होते.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त,
यावेळी पोलिसांनी भर पावसात सुरक्षेची चोख जवाबदारी पूर्ण केली.स्वतः नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपविभागीय अधिकारी चव्हाण,बुटी बोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख,एम आय डी सी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लांघी व शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजाविले.

Advertisement
Advertisement