Published On : Fri, Aug 2nd, 2019

बुटी बोरी येथे साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात

नागपूर: साहित्य भूषण अण्णा भाऊ साठे स्मारक समिती एम अाय डी सी बुटी बोरी, नागपुर यांच्या वतीने विश्व साहित्यीक, प्रथम शिवशाहीर,जगतदविख्यात साहित्यकार अण्णा भाऊ साठे यांची ९९ वि जयंती मोठ्या उत्सावात साजरी करण्यात अाली.या कार्यक्रमा निमित्त सर्वप्रथम मान्येवरांच्या हस्ते दिपप्रजलीत करुन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रतिमेला पुष्पहार घालुन कोटी कोटी वंदन करण्यात अाले.

साहित्य भूषण अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे सचिव अंकुश बावणे यांनी अापल्या प्रस्ताविक भाषणात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले अण्णा भाऊ अाम्ही अापले गुन्हेेगार अाहोत.अाज अण्णा भाऊंच्या पुतळ्यावर लक्षावधीचा खर्च करणारा अापला समाज माञ त्यावेळी अण्णा भाऊंना साधा भाकरीचा तुकडा द्यालाही पुढे अाला नाही.बहुजन समाज हा निव्वळ कृतघ्न अाहे यांची प्रचिती वारंवार अालेली अाहे.कमालीचे ढोंगी अाहो अापण ते गेल्यावर त्यांची किंमत समाजाला कळली.अण्णा भाऊ अापले गुन्हेेगार अहोत जमलं तर अाम्हाला क्षमा करा.अाणी अाज त्यांची जन्मशताब्धी करत अाहो.

तर साहित्य भूषण अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष गरिबाजी खोडके अापले विचार मांडतांना अण्णा भाऊ दारिद्र्यात जगले अाणी त्यातच कुपोषणाने गेले.ते अल्यायुषी होते१९२० ते १९६९ असे अवघे ४९ वर्षाचे अायुष्य त्यांना लाभले.त्यांना अनेकदा उपाशा पोटी राहावे लागे.राज्य शासनाकडुन त्यांना लेखक-कलावंताचे तुटपुंजे मानधान मिळे.ते दर अाठवड्याला मिळावे म्हणजे अापली चुल पेटेल असे सांगत ते मंञाल्यातील अधिकार्‍यांना भेटले.माञ तसे मानधान मिळाले नाही.अण्णा भाऊ गेले तेव्हा त्यांना किमान चार दिवसाचा उपवास घडलेला होता.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ट विचारवंत खंगार गुरुजी,साहित्य भूषण अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष,गरिबाजी खोडके, सचिव अंकुश बावणे,सहसचिव बाबाराव डोंगरे,कोषाध्यक्ष निवृती वानखेडे,श्री प्रविण ठोसर,श्री चेतन खंगार,श्री संजय जाधव, रुषिकेश बावणे,अर्चनाताई डोंगरे,वंदनाताई बावणे,अाशाताई खोडके,दिपालीताई वानखेडे,दिपा खंगार व अनेक नागरिक उपस्थित होते.

सूञसंचालन श्री बाबाराव डोंगरे तर अाभार श्री प्रविण ठोसर यांनी केले.