Published On : Wed, Apr 19th, 2017

महाराष्ट्र पोलीस दलात 104 पोलीस सब इंस्पेक्टर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु

Maharashtra-Police

Representational Pic


मुंबई (Mumbai):
तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्याची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील 104 पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे ही संधी तुमच्यासाठी एक सुवर्णसंधीच आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सागरी जिल्ह्यांच्या तसेच बृहन्मुंबई पोलीस दलाच्या अस्थापनेवर गट ब (अराजपत्रीत) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक आणि अर्हताप्राप्त उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.


महत्वाच्या तारखा –

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेवटची दिनांक आणि वेळ – 1 मे 2017 रात्री 11.59 वाजेपर्यंत
स्टेट बँकेत पैसे भरण्याची शेवटची दिनांक आणि वेळ – 3 मे 2017 रोजी (बँकेच्या वेळेनुसार)

पोलीस उपनिरीक्षक फर्स्ट क्लास इंजीन ड्रायव्हर आणि पोलीस उपनिरीक्षक सेकंड क्लास मास्टर या पदांसाठी आवश्यक प्रवेश शुल्क हे खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये आहे. मागास प्रवर्गासाठी 250 रुपये आहे. तर माजी सैनिकांना परिक्षा शुल्कातून सुट देण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी http://maharecruitment.mahaonline.gov.in या वेबसाईटवर 11 एप्रिल 2017 ते 1 मे 2017 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आपले अर्ज भरावेत. इच्छुकांना या भरतीसंदर्भात संपूर्ण प्रक्रियेची माहिती http://maharecruitment.mahaonline.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध होईल.