Published On : Wed, Apr 19th, 2017

कृषी खात्यात ७९ पदांसाठी भरती, ३० जुलैला पूर्वपरीक्षा

Krushi Vibhag
मुंबई (Mumbai):
बेरोजगारांना सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. राज्याच्या कृषी विभागात कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा, गट-ब संवर्गातील ७९ पदांसाठी भरती केली जात आहे. या जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार, ३० जुलै २०१७ रोजी पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. मुंबई (Mumbai), औरंगाबाद (Aurangabad), पुणे (Pune) व नागपूर (Nagpur) या जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येईल. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख ०२ मे २०१७ पर्यंत आहे.

या पूर्वपरीक्षेच्या निकालाधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा रविवार, १७ डिसेंबर २०१७ रोजी किंवा त्यानंतर होण्याची शक्यता आहे. अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. कृषी अधिकारी, महाराष्ट्र कृषी सेवा, गट-ब साठी एकूण ७९ पदे असून त्यापैकी अनुसूचित जाती- १५+६, विमुक्त जाती (अ)- २, भटक्या जमाती (ब)- ४+७, भटक्या जमाती (ड)- 1, इतर मागासवर्गीय- ११, एकूण मागासवर्गीय- ४६, खुला वर्ग- ३३ अशी पदे आहेत.

शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्या शाखेतील अन्य कोणतीही समान शैक्षणिक अर्हता मिळवलेली असावी. पदसंख्येत व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://mahampsc.mahaomline.gov.in / www.mpsc.gov.in या संकेतस्थळांस भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.