Published On : Thu, Jan 23rd, 2020

राज्य उत्पादन शुल्क अधिकारी कर्मचारी यांना कायद्याचे व अनुज्ञपतीधारक यांना ऑनलाईन कामाचे प्रशिक्षण कार्यक्रम

नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अधिकाऱ्यांसाठी कायद्यातील सुधारणा विषयी व अनुज्ञप्तीधारकांना ऑन लाईन सेवा विषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. *राज्य उत्पादन शुल्क अधिकारी कर्मचारी यांना कायद्याचे व अनुज्ञपती धारक यांना आन लाईन कामाचे प्रशिक्षण* *कार्यक्रम*
नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अधिकाऱ्यांसाठी कायद्यातील सुधारणा विषयी व अनुज्ञापती धारकांना ऑनलाईन सेवा विषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाचे उदघाटन नागपूरचे जिल्हाधिकारी श्री रविंद ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सन 2019 सालात लोकसभा, विधानसभा निवडणूक आचार संहिता कालावधीत पोलीस विभागास सोबत घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरित्या विशेष मोहिमा राबवून उल्लेखनीय काम केलेचे व *महाराष्ट्राचे इतिहासात प्रथमच राज्यात दारुबंदी गुन्ह्यात वर्ष्यात 300 गुन्ह्यात म्हणजे 17 टक्के केस मध्ये दोषसिद्धी* मिळाले बाबत अधीक्षक प्रमोद सोनोने व टीम चे अभिनंदन केले.

यावेळी जिल्हा सरकारी वकील ऍड नितीन तेलगोटे यांनी दारुबंदी कायद्यात झालेल्या सुधारणा व जप्त मुद्देमाल निर्गती बाबत विविध संदर्भ देऊन मार्गदर्शन केले.

√ दुसऱ्या सत्रात उपस्थित मद्य उत्पादक, ठोक व किरकोळ विक्रेते या 400 अनुज्ञप्तीधारकांना ठाण्याचे विभागीय उपायुक्त सुनील चव्हाण यांनी स्क्रीन वर *व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे* ऑनलाईन सेवेची गरज व होणारी वेळेची बचत तसेच पारदर्शकता या बाबत मार्गदर्शन करून राज्यात प्रथमच अशा मार्गदर्शक कार्यक्रमाची सुरुवात विदर्भातुन केले बाबत समाधान व्यक्त केले.

√ यावेळी साक्षी सॉफ्टवेअरचे डायरेक्टर शंतनू लिमये यांनी ऑनलाईन सेवा विषयी बेसिक पासून माहिती दिली व कामात येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा केली याच बरोबर दुय्यम निरीक्षक तथा रिसोर्स पर्सन राहुल अंभोरे व शैलेश अजमिरे यांनी उपस्थित अनुज्ञप्ती धारकांचे समाधान केले.

√ अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी ऑनलाईन सेवेची गरज ओळखून अनुज्ञप्ती धारकांनी कामकाज करणे बाबत व पारदर्शकता आणणे बाबत आवाहन केले.

√ या वेळी ASI कवडू रामटेके, कॉन्स्टेबल महादेव कांगणे व वाहन चालक राजू काष्टे यांनी झिरो पेंडन्सी कामकाजात उल्लेखनीय मदत केले बद्दल त्यांचा उप अधीक्षक एस एम मिरकुले यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
√ या कार्यक्रमाचे आयोजन निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी हॉटेल तुली इंटरनॅशनल यांचे सौजन्याने केले होते.

या वेळी आभार मानताना निरीक्षक बाळासाहेब पाटील यांनी नागपूर जिल्ह्यात पोलीस विभागास सोबत घेऊन राबवीत असलेल्या हॉटेल्स व धाब्यावरील कारवाया व त्यातून झालेल्या दोषसिद्धी, नेट वरुन निकाल प्राप्त करुन जप्त मुद्देमालाची विल्हेवाट व निर्गती, यामुळे राज्यात हा नागपूर पॅटर्न राबविणे बाबत आयुक्त कार्यालयाकडून सर्वच जिल्ह्याना सूचना होत असल्याने भविष्यात ऑनलाईन सेवा ही कार्यन्वित करुन अजून चांगले काम करून या विभागाचा नाव लौकिक वाढवू असे सांगून उपस्थितांचे आभार मानले.

√ या कार्यक्रमास उप अधीक्षक ज्ञानेश्वरी अहेर, एस एम मिरकुले, विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक सुहास दळवी, निरीक्षक केशव चौधरी, मुरलीधर कोडापे, सुभाष खरे, बाळासाहेब पाटील, सुनील सहस्त्रबुद्धे, अशोक शितोळे, सूरज कुसले, दत्तात्रय शिंदे व सर्व दुय्यम निरीक्षक, ASI, कॉन्स्टेबल स्टाफ इत्यादी अधिकारी / कर्मचारी तसेच दीपक देवसिंगांनीया, राजू जैस्वाल, प्रदीप जैस्वाल, प्रताप देवानी, अज्जू कुंगवाणी, संजय धनराजांनी, मंगेश वानखेडे, प्रकाश देवानी सह 400 हुन अधिक अनुज्ञप्ती धारक उपस्थित होते.