Published On : Tue, Jul 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

MSME संकट गडद! एका वर्षात 3.70 लाख रोजगारांवर परिणाम; महाराष्ट्रात सर्वाधिक उद्योग बंद, नागपुरात 5 वर्षांत 1,425 MSME बंद

Advertisement

मुंबई/नवी दिल्ली/नागपूर: देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रासमोरचे संकट अधिक गडद होत असल्याचे केंद्र सरकारच्या आकडेवारीतून समोर आले आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात देशभरातील सुमारे 3.70 लाख रोजगारांवर परिणाम झाला, तर महाराष्ट्रात सर्वाधिक 28,764 MSME उद्योग बंद झाल्याची माहिती संसदेत देण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून MSME क्षेत्राला प्रोत्साहन दिले जात असले तरी वाढता उत्पादन खर्च, बाजारातील स्पर्धा, आर्थिक अडचणी आणि व्यवसायातील विविध आव्हानांमुळे मोठ्या प्रमाणावर उद्योग बंद होत असल्याचे चित्र आहे.

Gold Rate
July 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 45,000 /-
Gold 22 KT ₹ 1,34,600 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संसदेत सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, 2025-26 मध्ये देशभरात 62,747 MSME उद्योग बंद झाले, तर 2024-25 मध्ये हा आकडा 39,446 होता. परिणामी रोजगारावरही मोठा परिणाम झाला. 2025-26 मध्ये सुमारे 3.70 लाख नोकऱ्या प्रभावित झाल्या, तर 2024-25 मध्ये सुमारे 2.60 लाख रोजगारांवर परिणाम झाला होता.

नागपूरमध्येही वाढती चिंता

Advertisement

नागपूर जिल्यात Udyam पोर्टलवर “बंद/शटडाउन” म्हणून नोंद झालेल्या MSME उद्योगांची संख्या गेल्या पाच वर्षांत सातत्याने वाढली आहे.

आर्थिक वर्ष बंद झालेल्या MSME
2021-22 68
2022-23 136
2023-24 181
2024-25 387
2025-26 653
2021-22 ते 2025-26 या कालावधीत नागपूर जिल्यात एकूण 1,425 MSME उद्योग बंद झाल्याची नोंद आहे.

महाराष्ट्रात बंदही सर्वाधिक, नोंदणीही सर्वाधिक
विशेष म्हणजे, उद्योग बंद होण्याच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असला तरी नवीन MSME नोंदणीमध्येही राज्यच अव्वल आहे. 2023-24 ते 2025-26 या कालावधीत राज्यात 75,57,276 नव्या MSME उद्योगांची नोंदणी झाली.

तज्ज्ञांच्या मते, नवीन उद्योग सुरू करण्याचा वेग कायम असला तरी ते दीर्घकाळ टिकवून ठेवणे हेच सध्या सर्वात मोठे आव्हान बनले आहे. वाढती उत्पादन खर्च, वित्तपुरवठ्याच्या अडचणी आणि बाजारातील स्पर्धेमुळे अनेक सूक्ष्म आणि लघुउद्योग अडचणीत सापडत आहेत.

Advertisement
पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews  #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पाचपावली में अवैध कत्लखाने का पर्दाफाश #NagpurNews #Panchpaoli #PoliceAction #CrimeNews #newsupdate

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews #paperleak #news

पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews #newsupdate #mobile

नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray  #nagpurnews #news #shivsenaubt

उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges