Published On : Tue, Jun 12th, 2018

महाराष्ट्र वीज नियामक आयोग सदस्य इकबाल बोहरी यांची कोराडी औष्णिक विद्युत केंद्रास भेट

Advertisement

कोराडी : महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे नवनियुक्त सदस्य व कौटुंबिक न्यायालयाचे निवृत्त प्रधान न्यायाधीश इकबाल बोहरी यांनी नुकतेच महानिर्मितीच्या ३ x ६६० मेगावाट क्षमतेच्या सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राला भेट दिली. अवजड संयंत्रे, वीज उत्पादनाची गुंतागुंतीची तांत्रिक पद्धती, विपरीत परिस्थिती, अखंडित वीज उत्पादनासाठी महानिर्मितीच्या मनुष्यबळाची कटीबद्धता याबाबत इकबाल बोहरी यांनी कोराडी वीज केंद्राच्या टीमचे विशेष कौतुक केले.

इकबाल बोहरी यांच्या प्रथम नगर आगमनाप्रसंगी मुख्य अभियंता अभय हरणे यांनी त्यांचे रोपटे व स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. यानंतर त्यांनी महानिर्मितीची चित्रफित बघितली. याप्रसंगी अभय हरणे यांनी संगणकिय सादरीकरणाद्वारे विस्तृत आढावा घेतला त्यात महाराष्ट्रातील वीज उत्पादन क्षेत्र,स्पर्धा,महानिर्मितीची वैविध्यपूर्ण क्षेत्रातील वाटचाल, महावितरण,महापारेषण, राज्य भार प्रेषण केंद्रे कार्य व भुमिका, राज्यातील विजेची मागणी,पुरवठा, एम.ओ.डी.,विद्युत कायदा २००३, वीज नियामक आयोग संबंधित निकषे इत्यादीबाबत इकबाल बोहरी यांनी माहिती जाणून घेतली.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

विशेष म्हणजे त्यांनी कोराडी वीज केंद्राच्या वॅगन टीपलर,एन.डी.सी.टी.,बॉयलर परिसर,पी.सी.आर., येथे प्रत्यक्ष भेट देऊन तांत्रिक माहिती जाणून घेतली तर जलप्रक्रिया विभाग परिसरात त्यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी मुख्य अभियंता राजकुमार तासकर, उप मुख्य अभियंते गिरीश कुमरवार, किशोर उपगन्लावार, अधीक्षक अभियंते तुकाराम हेडाऊ, श्याम राठोड, कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ धनंजय मजलीकर, जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अतुल गावंडे, सहाय्यक अभियंता प्रवीण बुटे, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी समाधान पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement