Published On : Sat, Mar 18th, 2017

अर्थसंकल्पात शेतक-यांसाठी करण्यात आल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा

Advertisement

Farmer
मुंबई:
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत २०१७-२८ या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाचे वाचन सुरु होताच विरोधकांनी शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी घोषणाबाजी सुरु केली. विरोधकांचा गदारोळ सुरु असतानाच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पाचे वाचन सुरु केले.

या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. ज्यामध्ये महिला वर्ग, तरुण, रोजगार, अल्पसंख्यांक आणि मागासवर्गीय यांच्यासोबतच शेतक-यांसाठीही अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. एक नजर टाकूयात या अर्थसंकल्पात शेतक-यांसाठी सरकारने काय दिलं आहे…

  • कृषी शिक्षणाला चालना देण्यासाठी यवतमाळ, नाशिक, पेठ (सांगली) येथे कृषी महाविद्यालये सुरु करणार
  • भाजीपाल्याला कोल्ड व्हॅन देण्यासाठी विशेष योजना
  • शेतक-यांना तातडीने कर्ज मिळावं, यासाठी तरतूदवीज जोडणीसाठी ९८१ कोटी रुपयांची तरतूद
  • मागेल त्याला शेततळं योजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही
  • मराठवाड्यातील कृष्णा खोरे पाणी प्रकल्प येत्या ४ वर्षांत पूर्ण करणार
  • जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दरवर्षी ५ हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचं ध्येय
  • जलयुक्त शिवारासाठी आतापर्यंत १६०० कोटी दिले, पुढील वर्षासाठी १२०० कोटींची तरतूद
  • अवर्षणग्रस्त भागासाठी पाणी पुरवठा प्रकल्प चार वर्षात पूर्ण करणार
  • जलसंपदा विभागात ८ हजार २३३ कोटींची तरतूद
  • कोकणात काजू लागवड आणि त्यावर प्रक्रियेचा कार्यक्रम
  • सूक्ष्म सिंचनासाठी शेतक-यांना कर्ज उपलब्ध करून देणार
  • सूक्ष्म सिंचनासाठी १०० कोटींची तरतूद
  • अॅग्रो मार्केटसाठी ५० कोटींची तरतूद
  • पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी १२५ कोटींची तरतूद
  • कृषी पंप जोडणीसाठी ९७९ कोटींची तरतूद
  • कृषी उत्पन्न २०२१ पर्यंत दुप्पट करणार, शेतकरी गट स्थापन करणार, २० शेतक-यांचा एक गट, २०० कोटी रुपये तरतूद, प्रकल्प यशस्वी झाल्यास पैसे कमी पडू देणार नाही
  • मराठवाड्यास पाणी प्रकल्प २५० कोटी
    गेल्या दोन वर्षांत जलसंपदा विभागासाठी ८,२३३ कोटींची तरतूद, पूर्ण निधीचे वाटप
  • मराठवाड्यातील ४००० गावांमध्ये, विदर्भातील १०० गावांमध्ये शेतीला संरक्षण देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प
  • जलयुक्त शिवार १६०० कोटी आतापर्यंत दिला, २०१७-१८ साठी १२०० कोटी प्रस्तावित
  • नियमित कर्ज भरत आहेत, त्या शेतक-यांना नम्र विनंती, कर्ज थकवू नका
  • शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठी सरकार कटिबद्ध
  • नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना लाभ होईल अशी योजना आणणार
  • थकीत कर्ज संपवावे लागेल, सातबारा कोरा करावा ही आमची भूमिकाकृषी क्षेत्रातील उत्पन्न २०२१ पर्यंत दुप्पट करणार