नागपूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी (SSC) आणि बारावी (HSC) पुरवणी परीक्षांचे निकाल अधिकृतरीत्या जाहीर केले आहेत. हे निकाल mahahsscboard.in या मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.
राज्यातील पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर अशा नऊ विभागांमध्ये जून आणि जुलै 2025 दरम्यान ही पुरवणी परीक्षा घेण्यात आली होती.
मुख्य परीक्षेत कमी गुण मिळालेल्या किंवा नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा हे दुसरे संधीचे दार उघडते. यंदाच्या निकालामुळे अशा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणक्रमात प्रवेश घेता येणार असून त्यांचे शैक्षणिक वर्ष वाचले आहे.
निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी mahahsscboard.in, hscresult.mkcl.org किंवा sscresult.mkcl.org या संकेतस्थळांपैकी कोणत्याही एकावर जाऊन आवश्यक माहिती भरावी आणि आपला निकाल तपासावा.
निकाल पाहिल्यानंतर त्याची छायाप्रती पुढील कामकाजासाठी जतन करून ठेवण्याचे आवाहन शिक्षण मंडळाकडून करण्यात आले आहे.