Published On : Fri, Mar 16th, 2018

म.टा.सन्मान २०१८ सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना महाराष्ट्र भूषण सन्मान प्रदान

मुंबई :- महाराष्ट्र टाइम्सच्या वतीने देण्यात येणारा म.टा.सन्मान २०१८ मधील सर्वोच्च असा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ संगीतकार, गीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना प्रदान करण्यात आला. रविंद्र नाट्य मंदिर येथे हा सोहळा संपन्न झाला.

याप्रसंगी टाइम्स वृत्त समूहाचे सीओओ श्रीजित मिश्रा, महाराष्ट्र टाइम्सचे कार्यकारी संपादक अशोक पानवलकर आदींची उपस्थिती होती. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पंडित हृदनाथ मंगेशकर यांना सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले.

Gold Rate
16 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,10,700 /-
Gold 22 KT ₹ 1,03,000 /-
Silver/Kg ₹ 1,29,800/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र टाइम्सने गेली अनेक दशके वाचकांच्या मनाची पकड घेतली आहे. म.टा. सन्मानाने समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्याची परंपरा सुरू झाली आहे. विशेषतः कला क्षेत्रात म.टा. सन्मानचे आगळे स्थान निर्माण झाले आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना म.टा.चा हा सर्वोच्च सन्मान देताना विशेष आनंद होतो आहे. या सन्मानासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांना दीर्घायुष्य आणि उत्कृष्ट आरोग्य लाभो, त्यांच्या हातून संगीत क्षेत्राची आणि रसिकांची अशीच सेवा घडत राहो असे अभिष्टचिंतनही करतो. आज भारतामध्ये संगीत, गीत या क्षेत्रात हृदयाला स्पर्श करून जाणारी भावना ही मंगेशकर कुटुंबियांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या व्यक्तिमत्वातही असेच पैलू आहेत. ज्यामुळे हा सर्वोच्च सन्मानही यथोचित ठरल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement