Published On : Fri, Mar 16th, 2018

ट्रॅफिक सिग्नल्सच्या ठिकाणी पर्यायी

Advertisement


नागपूर: शहरात विविध ठिकाणी मुख्यत्वे रिंग रोडच्या सीमेंटीकरणाच्या, फ्लायओव्हरच्या कामामुळे तसेच मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे ट्राफिक सिग्नल्सची केबल सिस्टीम निकामी होऊन बंद झाली आहे. ट्राफिक सिग्नल बंद असलेल्या ठिकाणांवर पर्यायी ट्राफिक सिग्नल बसविण्याचे काम मनपा प्रशासनातर्फे सुरू असून त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यामध्ये मदत होत आहे.

नागपूर शहरात एकूण १५५ ठिकाणांवर ट्राफिक सिग्नल्स बसविण्यात आले आहे. सद्यस्थितीत एकूण १३९ ठिकाणचे सिग्नल्स सुरू असून या १३९ ठिकाणांपैकी १५ ठिकाणांवर पोर्टेबल/ पर्यायी सिग्नल्स बसविण्यात आलेले आहे. उर्वरित १० जागी अशाच प्रकारची पर्यायी वाहतूक नियंत्रकाची व्यवस्था करण्याचे व स्थायी स्वरूपात असलेले ट्राफिक सिग्नलसच्या दुरूस्तीचे काम प्रगतीपथावर आहे.

उर्वरित बंद असलेल्या सिग्नल्सच्या ठिकाणांवर चालू असलेल्या मेट्रो रेल्वे, फ्लायओव्हर, रिंग रोडच्या बांधकामामुळे किंवा ते ठिकाण आता जंक्शन न राहिल्यामुळे स्थायी, अस्थायी सिग्नलींगची कोणतीही परिस्थिती नाही. अशा ठिकाणांची संख्या एकूण ११ आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता (विद्युत) यांनी दिली.