Published On : Fri, Jun 1st, 2018

नागपूरात ४ जुलैपासून विधिमंडळाचे अधिवेशन

Vidhan Bhavan

मुंबई: राज्य विधिमंडळाचे अधिवेशन ४ जुलै २०१८ पासून नागपूर येथे सुरु होणार आहे. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारात विधान भवन, नागपूर येथे ही बैठक बोलविली आहे.

विधानसभेचे कामकाज बुधवार दि. ४ जुलै २०१८ रोजी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे तर विधान परिषदेचे कामकाज हे दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. याबाबतचे आदेश दि.३१ मे २०१८ रोजी राज्यपाल कार्यालयातून काढण्यात आले आहेत.