Published On : Fri, Oct 25th, 2019

‘हे’ आहेत सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेले उमेदवार

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहेत. भारतीय जनता पक्षाला 103 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 56, राष्ट्रवादीला 54 आणि काँग्रेसला 50 जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत काही उमेदवारांवर मतदारांनी मतांचा मुसळधार पाऊस पाडल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

ही निवडणूक जरी विधानसभेची असली तरी, काही उमेदवार हे लोकसभा निवडणुकीत मिळतात इतक्या मताधिक्याने निवडून आले आहेत. राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडणूक जिंकणाऱ्या उमेवारांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांचा पहिला नंबर लागतो.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती मतदारसंघातील उमेदवार अजित पवार यांनी भाजपच्या गोपिचंद पडळकर यांचा पराभव केला आहे. पवारांनी पडळकर यांचा तब्बल 1 लाख 65 हजार 265 मताधिक्याने पराभव केला आहे. अजित पवारांना 1 लाख 94 हजार 313 मतं मिळाली आहेत.

Advertisement

काँग्रेसचे पलूस-कडेगाव मतदारसंघातील उमेदवार विश्वजीत कदम यांनी शिवसेनेच्या संजय विभुते यांचा पराभव केला आहे. कदम यांनी विभुते यांचा तब्बल 1 लाख 62 हजार 521 मताधिक्याने पराभव केला आहे. कदम यांना 1 लाख 70 हजार 34 मतं मिळाली आहेत.

भाजपचे मुरबाड मतदारसंघातील उमेदवार किसन काथोरे यांनी राष्ट्रवादीच्या प्रमोद हिंदूराव यांचा पराभव केला आहे. काथोरे यांनी हिंदूराव यांचा तब्बल 1 लाख 35 हजार 40 मताधिक्याने पराभव केला आहे. काथोरे यांना 1 लाख 74 हजार 68 मतं मिळाली आहेत.

काँग्रेसचे लातूर ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार धीरज देशमुख यांनी शिवसेनेच्या सचिन देशमुख यांचा पराभव केला आहे. धीरज देशमुख यांनी सचिन देशमुखांचा तब्बल 1 लाख 18 हजार 208 मताधिक्याने पराभव केला आहे. धीरज यांना 1 लाख 34 हजार 615 मतं मिळाली आहेत.

काँग्रेसचे भोकर मतदारसंघातील उमेदवार अशोक चव्हाण यांनी भाजपच्या बापूसाहेब गोरठेकर यांचा पराभव केला आहे. चव्हाण यांनी सचिन गोरठेकरांचा तब्बल 97 हजार 445 मताधिक्याने पराभव केला आहे. धीरज यांना 1 लाख 39 हजार 737 मतं मिळाली आहेत.

दरम्यान, पनवेलमध्ये भाजपच्या प्रशांत ठाकूर यांनी 92 हजार 730 इतक्या मतफरकाने शेकापच्या हरेश केणी यांच्या पराभव केला आहे. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी 89 हजार 300 मतांच्या फरकाने काँग्रेसच्या संजय घडीगावकर यांचा पराभव केला आहे.

रत्नागिरीत शिवसेनेच्या उदय सामंत यांनी 87 हजार 335 मतांच्या फरकाने राष्ट्रवादीच्या सुदेश मयेकर यांचा पराभव केला आहे. सामंत यांना तब्बल 1 लाख 18 हजार 166 मतं मिळाली आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement