Published On : Thu, Sep 12th, 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी मुहूर्त मिळाला

नवी दिल्ली : आज उद्या म्हणता म्हणता विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यास मुहूर्त मिळाला आहे. येत्या सोमवारी म्हणजे 16 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly election 2019 dates) तारखा जाहीर होणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.

निवडणूक आयोगाची आज बैठक होत आहे. या बैठकीत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा ठरवल्या जातील. या तारखांची घोषणा सोमवारी 16 सप्टेंबर रोजी होणार आहे.

Advertisement

महाराष्ट्रासह एकूण तीन राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडचा समावेश आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूक तारखा सोमवारी जाहीर होतील. तर झारखंडच्या निवडणुकांच्या तारखा नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील.

याआधी येत्या 9 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे यंदा 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान विधानसभेची निवडणूक होईल, असे चंद्रकांत पाटलांनी सांगितले होते.

2014 मध्ये झालेल्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल

भाजप – 122
शिवसेना – 63
काँग्रेस – 42
राष्ट्रवादी – 41
बविआ – 03
शेकाप – 03
एमआयएम – 02
वंचित/भारिप – 01
माकप – 01
मनसे – 01
रासप – 01
सपा – 01
अपक्ष – 07
एकूण – 288
2014 मध्ये विभागनिहाय कोणाला किती जागा मिळाल्या होत्या?

पश्चिम महाराष्ट्र (70) – भाजप 24, शिवसेना 13, काँगेस 10, राष्ट्रवादी 19, इतर 04

विदर्भ (62) – भाजप 44, शिवसेना 04, काँगेस 10, राष्ट्रवादी 01, इतर 03

मराठवाडा (46) – भाजप 15, शिवसेना 11, काँगेस 09, राष्ट्रवादी 08, इतर 03

कोकण (39) – भाजप 10, शिवसेना 14, काँगेस 01, राष्ट्रवादी 08, इतर 06

मुंबई (36) – भाजप 15, शिवसेना 14, काँगेस 05, राष्ट्रवादी 00, इतर 02

उत्तर महाराष्ट्र (35) – भाजप 14, शिवसेना 07, काँगेस 07, राष्ट्रवादी 05, इतर 02

एकूण (288) – भाजप 122, शिवसेना 63, काँगेस 42, राष्ट्रवादी 41, इतर 20

2014 ची निवडणूक

2014 च्या विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा सप्टेंबर महिन्यातच आचारसंहिता लागू झाली होती. 12 सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागली होती आणि 15 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. तर 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडली होती.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement