Published On : Wed, Mar 4th, 2020

वराडा येथे महाराजस्व अभियान व आरोग्य शिबीर संपन्न

कन्हान : – महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान ग्राम पंचायत वराडा, तहसिल कार्यालय पारशिवनी व प्राथमि क आरोग्य केंद्र साटक, तालुका आरोग्य विभाग पारशिवनी यांच्या सयुक्त विद्यमा ने मौजा वराडा येथे महाराजस्व अभिया न आणि आरोग्य शिबीर थाटात संपन्न झाले.

शिबीराचे उद्घाटन मा वरूणकुमार सहारे तहसिलदार पारशिवनी यांचे हस्ते व मा प्रदीपकुमार बम्हनोटे गट विकास अधिकारी पारशिवनी यांच्या अध्यक्षेत करण्यात आले. याप्रसंगी मा डॉ वाघ सर तालुका वैद्यकीय अधिकारी, डॉ वैशाली हिंगे वैद्यकीय अधिकारी साटक, सौ विद्याताई चिखले सरपंचा वराडा आदीने प्रामुख्याने उपस्थित राहुन मार्गदर्शन केले. या शिबीरात नागरिकांनी उत्पन्न प्रमाणपत्र, राशन कार्ड, आधार कार्ड व राजस्व विभाग संबधित ईतर योजनाचा लाभ घेतला. तसेच आरोग्य शिबीरात शाळेतील विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे रक्तगट तपासणी, डोळयाची तपासणी व ईतर आरोग्य विषयी तपासणी करण्यात आली असुन नि:शुल्क औषधी वितरण करण्यात आले.

नायब तहसिलदार श्री आडे हयानी नागरिकांच्या अडीअडचणी व कागदपत्राचे निराकरन करून मार्गदर्श न केले. शिबीराच्या नियोजनार्थ व यशस्विते करिता सरपंचा सौ विद्याताई चिखले, ग्राम सेवक निर्गुण शेळकी, ग्राम प्रेरक रूपेश चरडे, उपसरपंचा उषाताई हेटे, सदस्या सिमाताई शेळके, प्रभाताई चिंचुलकर, संगिताताई सोनटक्के, इंदुबाई गजभिये, सदस्य संजय टाले, राकेश काकडे, क्रिष्णा तेलंगे, आशिष धुर्वे, बचत गट सदस्यानी विशेष सहकार्य केले.

या शिबीरास राजस्व विभाग, तालु का आरोग्य विभाग, प्राथमिक आरोग्य केंद्र साटक अधिकारी, कर्मचारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद हयानी सेवा प्रदान केली. मोठया संख्येने वराडा, वाघोली, चांपा येथील नागरिकांनी उपस्थित राहुन शिबीराचा लाभ घेतला.