Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Sep 10th, 2020

  महानिर्मिती कंपनीचा कारभार म्हणजे “अंधेर नगरी चौपट राजा”

  – दोन आठवड्यापासून चौकाशी थंडबसत्यात,मुख्य अभियंता पद भर्ती घोटाळा,सत्ताधारी राजकीय नेते प्रकरण दडपण्याच्या तयारीत

  खापरखेडा/नागपुर – महानिर्मिती कंपनी अंतर्गत झालेल्या मुख्य अभियंता पदभर्ती घोटाळा प्रसार माध्यमात प्रसिद्ध होताच संपूर्ण महाराष्ट्रात वादळ उठले प्रसार माध्यमाच्या वृत्ताची दखल घेत चौकाशी समिती स्थापन करण्यात आली मात्र दोन आठवडे पूर्ण झालेत मुख्य अभियंता पद भर्ती घोटाळ्याची चौकाशी थंडबसत्यात पडली आहे त्यामुळे महानिर्मितीचा कारभार म्हणजे “अंधेर नगरी चौपट राजा” असे झाले असून सत्ताधारी राजकीय नेते व संबंधित निवड समितीने चांगलाच धसका घेतला असून मुख्य अभियंता पद भर्ती घोटाळा प्रकरण दडपण्याच्या तयारीत असल्याची माहिती उच्चपदस्थ खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

  महानिर्मितीच्या मुख्य अभियंता सरळसेवा भर्ती “२०१७” अंतर्गत ३ मुख्य अभियंता पदासाठी २२ में २०१७ रोजी भर्ती प्रक्रिया राबविण्यात आली ३ मुख्य अभियंता पदामध्ये १ ओपन, १ ओबीसी, १ एससी अशी पदे आरक्षित करण्यात आली मुख्य अभियंता सरळसेवा भर्ती प्रक्रिये अंतर्गत १२ ईच्छूक उमेदवारांनी वैयक्तिक मुलाखाती दिल्या होत्या मुख्य अभियंता सरळ सेवा भर्ती प्रक्रियेत ७० गुण लेखी परिक्षा व ३० गुण प्रत्यक्ष मुलाखाती करिता देण्यात आले होते मात्र मुख्य अभियंता सरळ सेवा भर्ती प्रक्रियेत मोठया प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आल्याच्या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहेत मुख्य अभियंता सरळसेवा भर्ती प्रक्रिये अंतर्गत १२ पैकी ३ उमेदवारांची मुख्य अभियंता पदी निवड करण्यात आली आहे निवड समितीत असलेल्या ८ दिग्गजांच्या आशिर्वाद खापरखेडा औष्णिक वीज केंद्रातील मुख्य अभियंता प्रकाश खंडारे यांना मिळाला त्यांना १० गुण कमी असतांना त्यांची मुख्य अभियंता पदी निवड करण्यात आली प्रकाश खंडारे यांना लेखी परीक्षेत ४०० गुणांपैकी २३२ गुण मिळालेत अर्थात ७०% गुणा पैकी त्यांना ४०.६०% गुण प्राप्त झाले तर प्रत्यक्ष मुलाखातीत ३० पैकी १७ गुण मिळाले प्रकाश खंडारे यांना मिळालेल्या एकूण गुणांची टक्केवारी ५७.६०% ईतकी आहे मात्र निवड समितीने चुकीच्या पद्धतीने १० गुण वाढवून त्यांची टक्केवारी ६७.६०% गुण करून त्यांची मुख्य अभियंता पदी निवड केली आहे मुख्य अभियंता सरळसेवा भर्ती घोटाळ्यात मोठया प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचे दबक्या आवाजात बोलल्या जात आहे

  मात्र राजकीय नेत्यापासून निवड समितीतील दिग्गज “तेरी भि चूप मेरी भि चूप” च्या अवस्थेत आहेत त्यामुळे कुठं तरी पाणी मुरत असल्याचे चित्र आहे मुख्य अभियंता सरळसेवा पद भर्ती घोटाळा प्रसार माध्यमात उघड होताच अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी ३१ आगस्ट २०२० रोजी रात्री उशिरा तडकाफडकी चौकाशीचे आदेश दिले मुख्य अभियंता सरळसेवा भर्ती घोटाळ्याची चौकाशी कार्यकारी संचालक (प्रकल्प) एस. एम. मारुडकर करणार आहेत मात्र दोन आठवड्याचा कालावधी होत अजूनही चौकाशी पुढे सरकली नाही मुख्य अभियंता घोटाळा भाजपच्या कार्यकाळात झाला शिवसेना कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस या तिकडी सरकारच्या कार्यकाळात उघड झाला मुख्य अभियंता पदी निवड झालेले प्रकाश खंडारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे नातेवाईक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

  त्यामुळे कार्यवाहीची शक्यता कमी आहे शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस, कांग्रेसने आपसात खातेवाटप करून घेतली आहे त्यामुळे वाट्याला आलेल्या खात्यात कोण्हीही हस्तक्षेप करणार नाही हे आधीच ठरल्यामूळे कोण्ही बोलण्यास तयार नाहीत राज्यात मोठे घोटाळे झालेत अधिकतर घोटाळे कांग्रेसच्या नावावर आहेत त्यामूळे राज्यात कांग्रेसचा जनाधार कमी झाला आहे सत्ताधारी राजकीय नेते आपल्या स्वार्थापोटी कार्यवाही करायला तयार नाहीत मुख्य अभियंता सरळसेवा भर्ती घोटाळ्यात आता प्रत्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी लक्ष घातलं तर आणि तरच कार्यवाही होण्याची शक्यता आहे अन्यथा महानिर्मितीचा कारभार म्हणजे “अंधेर नगरी चौपट राजा” असल्या सारखा आहे.


  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145