Published On : Thu, Sep 10th, 2020

क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत उपचारासाठी दुचाकीचे वितरण

नागपूर : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत नागपूर जिल्हा (ग्रामीण) मध्ये कार्यरत वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक व वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक यांना क्षयरुग्णांना भेटी, पर्यवेक्षकीय कामे, तसेच कार्यक्षेत्रातील दौरे यासाठी शासनातर्फे 13 दुचाकी वाहने मंजूर करण्यात आली आहे.

यातील पहिल्या टप्प्यात जिल्हा क्षयरोग केंद्र, नागपूर (ग्रामीण) कार्यालयाला पुरवठा झालेल्या 9 मोटरसाईकलचे वाटप जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रश्मीताई बर्वे यांच्या हस्ते ग्रामीण क्षयरोग कर्मचाऱ्यांना वाहनांची चावी देवून करण्यात आले.

यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ममता सोनसरे व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दुचाकी वाहनाचा पुरवठ्याबद्दल डॉ.ममता सोनसरे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रश्मीताई बर्वे तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे आभार मानले.