Published On : Thu, Dec 27th, 2018

नागपूर मेट्रोत प्रवास करायला आवडेल: डॉ.अमोल कोल्हे

Advertisement

माहिती केंद्राला सदिच्छा भेट, ‘धावणार माझी मेट्रो’ कॅम्पेन’ ची केली प्रशंसा

नागपूर : अतिशय वेगाने पूर्ण होणाऱ्या नागपूर मेट्रो प्रकल्पामुळे नागपूर शहराला नवी ओळख निर्माण झाली आहे. नागपुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे कार्य पूर्ण होताच मला मेट्रोत बसायला फार आवडेल अशी इच्छा ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ महानाट्याचे अभिनेते महाराष्ट्राचे लाडके डॉ.अमोल कोल्हे यांनी जाहीर केली. सध्या शहरात गाजत असलेल्या ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या महानाट्यासाठी नागपुरात आलेल्या डॉ.अमोल कोल्हे यांनी गुरुवारी महा मेट्रो नागपूरच्या झिरो माईल येथील माहिती केंद्राला भेट दिली. शहरात मेट्रो प्रकल्पाचे कार्य सुरु असतांनाच सामाजिक व पर्यावरणाच्या दृष्ठीकोणातून नागरिकांना सुविधा देण्यासाठी महा मेट्रो प्रशासन कटीबद्द असल्याने हे अभिमानाची बाब असल्याचे डॉ.अमोल यांनी स्पष्ट केले.

महा मेट्रो नागपूरने सुरु केलेल्या ‘धावणार माझी मेट्रो’ कॅम्पेनला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने डॉ.अमोल कोल्हे यांनी देखील या कॅम्पेन’ ची प्रशंसा केली. या कॅम्पेन बद्दल सविस्तर माहिती त्यांनी जाणून घेतल्यानंतर माहिती केंद्रात या कॅम्पेन अंतर्गत लावण्यात

Advertisement

आलेल्या ‘विश वॉल’ वर त्यांनी महा मेट्रोच्या कार्याचे अभिनंदन करत शुभेच्या व्यक्त केल्या. महा मेट्रो राबवित असलेले अशे आगळे वेगळे उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महाव्यवस्थापक (प्रशासन) श्री.अनिल कोकाटे यांनी महा मेट्रो अंतर्गत सुरु असलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पाविषयी डॉ.अमोल यांना सविस्तर माहिती दिली. माहिती केंद्रासह याठिकाणी लावण्यात आलेले सेल्फी पॉईंट’चे नागरिकांमध्ये किती आकर्षण आहे, याबद्दल देखील डॉ.अमोल यांना सांगितले. तसेच ‘नागपूर मेट्रो फेसबुक पेज’च्या माध्यमातून नागरिक नेहमीच मेट्रोच्या संपर्कात राहत असतात. अतिशय कमी वेळेत ४.५ लक्ष पेक्षा ज्यास्त फॉलोवर्स नागपूर मेट्रोच्या ‘फेसबुक पेज’ वर आहे. देशातील सर्व शासकीय विभागामध्ये नागपूर मेट्रोचे फेसबुक पेज प्रथम क्रमांक वर असण्याचा गौरव नागपूर मेट्रोने प्राप्त केला आहे.