कन्हान : – ग्रामीण विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सालवा येथे ४६ व्या मौदा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटन गुरुवार (दि २७) रोजी ११ वाजता सौ.निशाताई सावरकर अध्यक्ष जि. प. नागपूर यांच्या हस्ते तर मा मनोज कोठे सभापती पं. स.मौदा यांच्या अध्यक्षेत करण्यात आले .
याप्रसंगी प्रमुख अतिथी मा अमोल गारूडी अध्यक्ष श्री साई सेवा शिक्षण मंडळ, विजयराव काठाळकर सचिव श्री साई सेवा शिक्षण मंडळ, सौ.भारतीताई गोडबोले सदस्या शिक्षण समिती जि प नागपूर, नंदाताई लोहबरे सदस्या जि.प. नागपूर, महेशजी मोटघरे सदस्य पं.स मौदा, धनपालजी हरोडे सरपंच ग्राम पंचायत एंसबा, सौ.जयश्री पाटील सरपंच सालवा, सौ.वंदनाताई भोले सरपंच नरसाळा, रवींद्र बागडे उपसरपंच एंसबा,नारायणराव ठाकरे,राजेश मोटघरे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाची मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून सरस्वती पूजनाने सुरुवात करण्यात आली. या प्रदर्शनीचे प्रास्ताविक मनोहर बारस्कर गट शिक्षणाधिकारी पं स मौदा यांनी केले.विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करावा. विद्यार्थ्यांच्या प्रगती करिता शिक्षकांनी नवनवीन तंत्राचा वापर करून विद्यार्थ्यांना घडवावे असे कार्यक्रमाच्या उदघाटीका सौ.निशाताई सावरकर यांनी मार्गदर्शन केले. विजयराव कठाळकर सचिव साई सेवा शिक्षण मंडळ यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्या साठी विद्यालयातील अटल लँब ची माहिती दिली. ग्रामीण विद्यार्थ्यांनी अटल लँब चा भरपुर लाभ घ्यावा असे आवाहन केले.
या प्रसंगी प्रदर्शनाला मा. डी मल्लिकार्जुन रेड्डी आमदार रामटेक विधानसभा यांनी भेट देऊन विद्यार्थ्यां च्या प्रतिकृतीची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या विज्ञान प्रदर्शनीत वर्ग ६ ते ८ वि चा प्राथमिक व उच्च माध्यमिक गटात ५७, वर्ग ९ ते १२ माध्यमिक व उच्च माध्यमिक गटाच्या ३९ प्रतिकृती तसेच शिक्षक प्रतिकृती यांनी सहभाग घेतला ,तालुक्यातील सर्व उच्च प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळानी उत्स्फुर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.एम. एस.नारनवरे हयानी तर आभार प्रदर्शन सौ.आशाताई गणवीर अधीक्षक शा.पो. आ, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मौदा यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद परिश्रम घेत आहेत.