Published On : Mon, Jul 29th, 2019

महाजनादेश यात्रेचे जोरदार स्वागत करा : पालकमंत्री

Advertisement

काटोल-नरखेडमध्ये घराघरांवर भाजपाचे झेंडे लावा
महाजनादेश यात्रा नियोजन बैठक
मुख्यमंत्र्यांची जाहीरसभा होणार

नागपूर: भाजपाची महाजनादेश यात्रा येत्या 2 ऑगस्ट रोजी काटोल विधानसभा मतदारसंघात येत आहे. या यात्रेचे जोरदार स्वागत कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी करावे, असे आवाहन करीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काटोल आणि नरखेड तालुक्यात घराघरांवर भाजपाचे झेंडे लावा, असे आवाहन केले.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या यात्रेच्या निमित्ताने भाजपा काटोल विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची एक बैठक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काटोल येथे आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, विस्तारक भोलाजी सहारे, अरविंद गजभिये, संजय टेकाडे, उकेश चव्हाण श्यामराव बारई, मनोज कोरडे, चरणसिंग ठाकूर, संदीप सरोदे, दिलीप ठाकरे, जयस्वाल आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पालकमंत्री बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले की, संपूर्ण मतदारसंघ 2 दिवसात ढवळून काढा. यात्रेसाठी वातावरण निर्मिती करा. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विविध माध्यमांतून पोहोचा आणि लोकांना विनंती करा. आजही पंतप्रधान मोदी यांची लाट कायम आहे. मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा 2 ऑगस्टला काटोल येथे होणार आहे. या सभेची तयारीही जोमाने करा. याशिवाय नवीन मतदार नोंदणीचा कार्यक्रम करा. पक्षाने दिलेल्या फोन नंबरवर मिस्डकॉल द्या. येत्या 17 ऑगस्टकपर्यंत 25 हजारावर नवीन मतदारांची नोंदणी करणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.
यापूर्वी डॉ. राजीव पोतदार यांनीही कार्यकर्त्यांना नियोजनाची माहिती दिली. महाजनादेश यात्रेत हजारो नागरिक व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

सावनेर मतदारसंघ नियोजन बैठक
सावनेर येथेही महाजनादेश यात्रा प्रवेशणार असून या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना पालकमंत्री बावनकुळे म्हणाले- नवीन मतदार पक्षाशी जोडा. तसेच महाजनादेश यात्रेचा संदेश गावागावातील सर्व घरांपर्यंत गेला पाहिजे. पंतप्रधान मोदी यांच्यामागे आजही मतदार उभा आहे. आपण सामान्य माणसांपर्यंत पोहोचले तर निश्चितच आपल्याला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. आजही 80 टक्के मतदार हा पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच आहे याचा अनुभव कार्यकर्त्यांना निश्चितपणे येणार आहे.

या बैठकीला जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, तारीक कुरेशी, सोनबा मुसळे, रमेश मानकर, अशोक धोटे, दादा मंगळे, प्रकाश टेकाडे, संजय टेकाडे, राजेश जीवतोडे, श्रीमती मीना तायवाडे, किशोर मुसळे आदी उपस्थित होते. सावनेर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीरसभा होणार आहे. या जाहीरसभेला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील यासाठी प्रत्येक घराघरातील नागरिकांपर्यंत पोहोचा. विविध माध्यमातून महाजनादेश यात्रा आणि मुख्यमंत्र्यांच्या जाहीरसभेची माहिती गावागावात पोहोचली पाहिजे याची जबाबदारी घ्यावी.

यासोबतच भाजपाची सदस्य नोंदणी मोहीम आणि नवीन मतदार नोंदणी अभियान हे उपक्रमही जोरात राबविणे आवश्यक आहे. पुन्हा राज्यात भाजपाचे सरकार सत्तारूढ होणार आहे. आपल्या मतदारसंघात कार्यकर्ते कुठेही कमी पडणार नाही याची खबरदारी घेऊन कामाला लागण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी याप्रसंगी कार्यकर्त्यांना जिप मतदारसंघ निहाय आढावा घेतला.

Advertisement
Advertisement