Published On : Mon, Jul 29th, 2019

धानल्याच्या आरोग्य शिबिरात 1664 रुग्णांची तपासणी

Advertisement

श्री श्री फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम
शिबिरामुळे ग्रामीण भागात आरोग्याबाबत जनजागृती

नागपूर: मौदा तालुक्यातील धानला या जि.प. मतदारसंघात आज झालेल्या आरोग्य शिबिरात 1664 रुग्णांची शिबिरात तपासणी झाली असून आवश्यक त्या रुग्णांना नि:शुल्क औषधोपचारही करण्यात आले.

श्री श्री फाऊंडेशनतर्फे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी नि:शुल्क आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येत आहे. आतापर्यंत 5 ठिकाणी ही शिबिरे पार पडली असून सर्व शिबिरांमध्ये 1500 ते 2000 नागरिक शिबिराचा लाभ घेऊन विविध तपासण्या करून घेत आहेत. या शिबिरात शासकीय आणि खाजगी रुग्णालयांच्या डॉक्टरांची चमू तपासणी व औषधोपचारासाठी झटत आहेत. श्री श्री फाऊंडेशन हा उपक्रम सामाजिक जाणीव म्हणून राबवीत असल्याचे मत यावेळी संस्थापक अध्यक्ष संकेत बावनकुळे यांनी सांगितले.

आरोग्य शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.च्या अध्यक्ष निशा सावरकर, चांगोजी तिजारे श्री श्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सकेत बावनकुळे, टेकचंद सावरकर, अनिल निधान, योगेश वाडीभस्मे, हरीश जैन, मुन्ना चालसानी आदी उपस्थित होते. शिबिरात जनरल मेडिसिन विभागाकडे 14 नागरिकांच्या तपासण्या केल्या. हृदयरोगाची तपासणी 65 जणांनी, मधुमेहाची तपासणी 272 जणांनी, स्त्री रोग विभागाने 24 महिलांची तपासणसी केली. मूत्र रोगाची तपासणी 19 जणांनी केली, नेत्र रोग तज्ञांनी 65 जणांची, जनरल सर्जरी विभागाने 255 जणांची, 120 जणांची दंत तपासणी, 75 रुग्णांवर दाताची शस्त्रक्रिया करण्यात आली. छातीच्या रोगांच्या विभागाने 117, हृदयरोग 49, रक्त तपासणी 254 जणांनी, सिकलसेलची तपासणी 46 जणांनी तर अन्य 158 जणांची तपासणी करण्यात आली.

या आरोग्य शिबिरात डॉ. मनिषा राजगिरे, डॉ. अमोल पाटील, डॉ. पराग देशमुख, डॉ. स्वाती वणीकर, डॉ. श्वेता ठाकरे, डॉ. गुंडलवार, डॉ. गुरु, डॉ. वर्धने, डॉ. कपिल देवतळे, डॉ. राहुल लामसोंगे, डॉ. पाटील, डॉ. हजारे, डॉ. रघुवंशी, डॉ. भोयर, डॉ. गिल्लूरकर चमू व डॉ. महात्मे यांची चमू सहभागी झाली होती.