Published On : Tue, Feb 18th, 2020

महा मेट्रो कर्मचाऱ्यांने एका परिवाराप्रमाणे कार्य केले: डॉ ब्रजेश दीक्षित

नागपूर- महा मेट्रोचे सर्व कर्मचारी एका परिवारातील सदस्याप्रमाणे कार्य करीत असून त्यांनी कीर्तिमान रचवला केला आहे. चांगले कार्य करण्याचे ध्येय महा मेट्रोने हाती घेतले असून ते प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली आहे. पाच वर्षाच्या कालावधीत महा मेट्रोच्या चमूने उत्तम कार्य केले आहे आणि त्यामुळे सर्व अभिनंदनाकरता पात्र आहे. सदर विचार महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केले.

महा मेट्रोच्या पाचव्या स्थापना दिनानिमित्त मेट्रो भवन येथे आयोजित एका समारंभात डॉ. दीक्षित उपस्थितांना संबोधित करत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यवस्थापकीय संचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित, संचालक (प्रकल्प) महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टॉक आणि सिस्टिम), सुनील माथूर, संचालक (वित्त) एस शिवमाथन यांनी दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

पाच वर्षाची सुवर्णमयी वाटचाल: आपल्या भाषणात व्यवस्थापकीय संचालक डॉ दीक्षित पुढे म्हणाले कि, महा मेट्रोच्या स्थापने पासून ते आज पर्यतची सुवर्णमयी वाटचाल सर्वांनी पार केली. ८६ % कार्य पूर्ण झाले असून,२५ किलोमीटर मेट्रो लाईनचे कार्य अवघ्या ५० महिन्यात पूर्ण करण्याचे काम, मेट्रो टीमने मेहनत आणि एकाग्रचिताने केली आहे. आपण कार्य पूर्ण करतांना कुठलीही कमतरता सोडली नाही. तसेच निर्धारित केलेल्या लक्ष्यावर पोहोचलो. मेट्रो भवनमध्ये आयोजित कार्यक्रमा प्रसंगी प्रसन्नता व्यक्त करतांना ते म्हणाले कि, आज आपण आपला स्थापना दिवास आपल्या हक्काच्या जागेवर मनवीत आहोत.

मेट्रोच्या कामाचा गणेश रवी भवन येथून झाला व त्यानंतर मेट्रो हाऊस मध्ये मोठा प्रवास केला. आज आपण आपल्या नवीन इमारतीत पोहोचलो. जे कर्मचारी सोडून गेले आहे त्यांच्या कार्याची व्यवस्थापकीय संचालक यांनी प्रशंसा केली. त्यांनी सांगितले कि, सामान्य व्यक्ती देखील असाधारण कार्य करून जातात. मेट्रोच्या कार्यादरम्यान प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्या बद्दल नागरिकांचे त्यांनी आभार मानले.

संचालक (वित्त) एस शिवमाथन म्हणाले की महा मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नवीन उदाहरण कायम केले आहे. महा मेट्रोने संपूर्ण देशात नाव कमावले आहे आणि व्यवस्थापकीय संचालकांच्या कार्यक्षम नेतृत्वातूनच हे शक्य झाले आहे. नॉन फेअर बॉक्समुळे महा मेट्रोलाही चांगली आवक झाली आहे. ते म्हणाले की, शहरातील रहिवाशांचे जीवनचक्र सुखकर करण्याचे काम महा मेट्रोने केले आहे

रिच -१ चे कार्यकारी संचालक देवेंद्र रामटेककर ह्यांनी कामादरम्यान झालेल्या अनुभवाचे वर्णन करताना सांगितले की सीताबर्डी इंटरचेंजचे काम केवळ गुंतागुंतीचे नव्हते तर अत्यंत आव्हानात्मक व धोकादायक देखील होते. रहदारी न थांबवता कामाचा वेगही कमी न करता सुरक्षा बाळगून स्पॅन टाकण्यात आले. अनेक संकटे व संघर्षाचा सामना करत इंटरचेंजचे कार्य पूर्ण करावे लागले. दर्जेदार आणि गतिशील कार्याचे या टीमने एक नवीन उदाहरण कायम केले आहे.

सुधाकर उराडे, जनरल मॅनेजर (ऑपरेशन अँड मेंटेनन्स) यांनी आपल्या भाषणात ट्रेन संचालनातील तांत्रिक समस्या कशा उद्भवतात त्या सोडवायला कसे प्रयत्न करावे लागतात याचा उल्लेख केला. ते म्हणाले की या आव्हानात्मक कामातून आम्हाला बरेच काही शिकायला मिळाले आहे. एक्वा लाइनवर झालेल्या संघर्षामुळे यश मिळू शकले.

मेट्रो मित्र मयुरेश गोखले मेट्रोचे म्हणाले कि काम सुरू झाले त्या वेळी बहुतेक लोकांचे मत या प्रकल्पाकडे नकारात्मक होते असे ते म्हणाले. कठोर परिश्रम करून मेट्रोची टीम केवळ 5 वर्षात 100 वर्षाच्या दर्जाचे कार्य पूर्ण करण्यास यशसिपने पुढे जात आहे. आज प्रत्येकाची मते सकारात्मक झाली आहेत. मेट्रो मित्र श्री आकाश लिखारे यांनी मेट्रो प्रवासातील त्यांच्या सकारात्मक अनुभवांबद्दल आणि त्यात मिळणाऱ्या सोयी सवलतींबद्दल समाधान व्यक्त केले आणि माझी मेट्रो आल्याचा आनंद व्यक्त केला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री अनिल कोकाटे, कार्यकारी संचालक (प्रशासन) ने केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीमती रेणुका देशकर यांनी केले. या दरम्यान एक शॉर्ट फिल्मचे प्रदर्शन करण्यात आले ज्यामध्ये महा मेट्रो, नागपूरच्या ५ वर्षाची कालकीर्द दाखविण्यात आली