Published On : Wed, Aug 29th, 2018

महा मेट्रो : रस्ता सुरक्षा अभियानात ए.एफ.डी.(AFD) अधिकाऱ्यांची उपस्थिती

Advertisement

नागपूर : महा मेट्रो नागपूरतर्फे सुरु असलेल्या रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत बुधवार २९ ऑगस्ट रोजी उत्तर अंबाझरी मार्गावरील धरमपेठ सायंस महाविद्यालात कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थांना रस्ता सुरक्षेवर मार्गदर्शन पथनाट्य देखील सादर करण्यात आले.

उल्लेखनीय म्हणजे नागपूर दौऱ्यावर आलेल्या ए.एफ.डी. आणि युरोपियन युनियनच्या सदस्यांनी पथनाट्य दरम्यान आपली उपस्थिती नोंदवली. यावेळी ‘यम है हम, हम है यम’ म्हणत यम आणि चित्रगुप्त यांनी रस्ते अपघातासाठी कारणीभूत बाबींवर विद्यार्थ्यांना अनोख्या पद्धतीने मार्गदर्शन करत होते. दरम्यान उपस्थित असलेल्या ए.एफ.डी.च्या संचार अधिकारी (कॉमुनिकेशन ऑफिसर) राधीका टाकरु आणि युरोपियन युनियनच्या वरिष्ठ प्रकल्प अधिकारी स्मिता सिंग यांनी अभियानाचे कौतुक केले. यावेळी यम आणि चित्रगुप्त यांचे अभियान पाहून विद्यार्थ्यांनी यम व चित्रगुप्त सोबत सेल्फी काढली.

रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने शहरात अनेक ठिकाणी हे अभियान चालविले जात आहे. महा मेट्रोची संपूर्ण टीम अभियानात सक्रीय असते. विविध शाळा आणि महाविद्यालयात जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेसंदर्भात महा मेट्रोचे सुरक्षा अधिकारी मार्गदर्शन करतात.

सार्वजनिक वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात वापर करावा. तसेच येत्या काळात सुरु होणाऱ्या आरामदायी मेट्रोचा प्रवास सर्वांनी करावा जेणेकरून वाहनांची सख्या कमी होऊन रस्त्यावरील अपघात होणार नाही, प्रदूषणावर आळा बसेल अश्या महत्वाच्या बाबींवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. मुख्य आणि गर्दीच्या ठिकाणी वाहनचालकांना हेल्मेट घालून प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळावे असा संदेश देण्यात येतो.

*रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत आतापर्यंत ८ शाळा, ३ महाविदालय आणि २० हून अधिक गर्दी असलेल्या शहराच्या महत्वाच्या चौकात हे उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आले.* वाहतुकीचे नियम सर्वाना माहिती व्हावी यासाठी शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि रस्त्यावर वाहन चालकांना पत्रके वितरीत केली जातात. अभियानाचे सर्वत्र सकारत्मक प्रभाव पडत असून नागरिक अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. शहरातील विविध शाळेतून आणि महाविद्यालातून कार्यक्रमाची मागणी होत आहे.