Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Sep 7th, 2017

  “महा मेट्रो: इको पार्क चे भूमीपूजन”


  नागपूर:
  महा मेट्रो च्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाअंतर्गत मिहान डेपो ला लागून १३ एकर जागेवर ‘इको पार्क’ चे निर्माण केल्या जात आहे. अनंत चतुर्दशीच्या पावनपर्वावर महा मेट्रो चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी इको पार्क चे विधिवत भूमिपूजन करून कार्याचा शुभारंभ केला. या वेळी डॉ. दीक्षित म्हणाले की, इको पार्कमुळे इको टूरीजम ला निश्चितच प्रोत्साहन मिळेल. डॉ. दीक्षितांनी मोठ्या परिसरात बनत असलेल्या इको पार्कच्या प्रस्तावित नकाशाचे अवलोकन करून विशेषद्धना आवश्यक त्या सूचना दिल्या. इको पार्कमध्ये मनोरंजन झोनही तयार केल्या जाईल जे पर्यटकांनसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल हे निश्चित.

  हे झोन ५०५० वर्ग मीटर मध्ये राहील, या झोन मध्ये नॉन अम्पिथीएटर, लाईट आणि साउंड शो, फूड कोर्ट थीम वर आधारित खेळाचीही सुविधाही राहणार आहे. या भागात असलेल्या दोन नाल्यांचा उपयोग करून परिसराला आकर्षक करण्याचाही निर्णय घेतल्या गेला आहे. मिनी तलावाचे स्वरूप असलेले हे क्षेत्र पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रस्थान बनेल यात शंकाच नाही.

  इको पार्क पर्यंत पोहचन्यासाठी मेट्रो रेल्वे ची सुविधा या ठिकाणी उपलब्ध राहणार. याप्रकारे १३५५० वर्ग मीटर मध्ये एग्रो टूरिजम चे निर्माण केल्या जाईल. हे पर्यटकांच्या आकर्षणाचे विशेष केंद्र राहिल. या ठिकाणी फळांच्या उत्पादनासाठी बागिच्या व्यतिरिक्त वर्टीकल फार्मिंग, हुरडा फेस्टीवल, स्मार्ट पायलट प्रोजेक्ट ही राहील.

  फळांच्या उत्पादनासोबतच धान्य उत्पादनाचे विक्री केंद्रही विकसित केल्या जाईल. व्लब हाऊस करीता ४२३० वर्ग मीटर जागा निर्धारित केल्या गेली आहे. अर्बन मार्केटचे निर्माण ५६५० वर्ग मीटर मध्ये केल्या जाईल. वेट्लैन्ड इको लॉजिकल झोनसाठी ४२३० वर्ग मीटर जागा निश्चित केल्या गेली आहे. इको पार्क मध्ये अभ्यंगतांसाठी मनोरंजना सोबतच खाण्या –पिण्याची व्यवसाथाही राहणार, या सोबतच आवडीच्या वस्तूही पर्यटक खरेदी करू शकतील. नैसर्गिक वातावरणात निर्माण होणाऱ्या या इको पार्कच्या निर्माण कार्यासाठी २५ करोड रुपये निधीची तरतूद या ठिकाणी केल्या गेली आहे.

  इको पार्क च्या उद्यानात विविध प्रजातीच्या फुलांसोबत वातावरणासाठी पोषक वनस्पतीची लागवड केल्या जाईल. यात पक्ष्यांकरिता एक वेगळा झोन तयार केल्या जाईल. मिहान डेपो मध्ये मेट्रो ट्रेनच्या रखरखावा सोबतच या क्षेत्रात इको पार्क च्या निर्माणकार्यामुळे हे क्षेत्र पर्यटकांनकरीता येणाऱ्या काळात आकर्षनाचे केंद्र राहील. महा मेट्रो च्या कार्या पासून जेथे नागपूरकरांना लवकरच विश्ववस्तरीय रहदारी करण्याकरीता सुविधा उपलब्ध होणार, या सोबतच स्मार्ट सिटी च्या निर्माण मध्ये महा मेट्रो चे उल्लेखनीय योगदान राहील. महा मेट्रो द्वारे लिटील वूड चे प्रावधान देखील नैसर्गिक वातावरणाला शहरी क्षेत्रामध्ये प्राथमिकता देण्याचे ज्वलंत उद्हारण आहे. तसेच इको पार्क चे निर्माण पर्यटकांन करीता बहुपयोगी ठरणार. हे इको पार्क शहराच्या गौरवामध्ये नव्कीच भर टाकणार आहे. या वेळी महामेट्रो चे संचालक (प्रकल्प) महेश कुमार अग्रवाल, महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रिच – १) देवेंद्र रामटेक्कर, महाव्यवस्थापक (जमीन) नंदनवार , अतिरिक्त महाव्यवस्थापक (प्रॉपर्टी डेवलपमेंट) संदीप बापट, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक ( मिहान डेपो) साई शरण दीक्षित, मिडिया कंसलटट सुनील तिवारी तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145